भारतात आधार कार्ड प्रमुख दस्तऐवज आहे तसेच रेशन कार्ड देखील अति महत्वाचे कागदपत्र आहे. भारतात आधार कार्ड शिवाय एक सिम देखील खरेदी केली जाऊ शकत नाही. रेशन कार्ड हे प्रामुख्याने गरीब लोकांना स्वस्तात धान्य पुरवण्यासाठी वितरित केले गेले होते. तसेंच रेशन कार्ड अनेक सरकारी कार्यात पुराव्यासाठी उपयोगात आणले जाते. आता या दोन्ही महत्त्वाच्या डॉक्युमेंट संदर्भात एक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे रेशन कार्ड आधार कार्ड ची लिंक करणे अनिवार्य आहे तसेच यासाठी मुदतवाढ देखील देण्यात आली आहे.
म्हणून जर तुम्ही अजून पर्यंत रेशन कार्ड सोबत आधार लिंक केले नसेल, तर लवकरात लवकर रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करा, अन्यथा आपणास अनेक समस्यांना सामोरे जाणे पडू शकते. आज कृषी जागरण आपल्या वाचक मित्रांसाठी रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करण्याची प्रोसेस व याविषयी महत्वपूर्ण माहिती घेऊन आले आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याची प्रोसेस.
घरबसल्या करा रेशन कार्डला आधार लिंक
रेशन कार्ड ला आधार लिंक करण्यासाठी आपणास कोणत्या ऑफिस मध्ये जाण्याची आवश्यकता नाही, हे कार्य आपण अगदी घरबसल्या सहजरित्या ऑनलाईन करू शकता. आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्रीय खाद्य सुरक्षा मंत्रालय द्वारा नुकतीच च एक माहिती देण्यात आली आहे त्यानुसार राशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढ करण्यात आली आहे.
मुदत वाढ देण्याचे कारण असे की अजूनही अनेक लोकांनी आपल्या राशन कार्ड सोबत आधार लिंक केलेले नाहीये त्यामुळे ज्या लोकांनी रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक केलेले नाही त्या लोकांनी लवकरात लवकर हे महत्त्वाचे काम आपटून घ्यावे. तसेच ज्या लोकांनी अजून पर्यंत आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक केलेले नसेल त्या लोकांना सुद्धा आता रेशन मिळत राहणार आहे.
रेशन कार्ड आधार सोबत लिंक करण्याची प्रोसेस
जर आपण ही आतापर्यंत आपल्या रेशन सोबत आधार कार्ड लिंक केलेले नसेल, तर लवकरात लवकर लिंक करून घ्या यासाठी आपणास आधार कार्ड च्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल त्यानंतर तेथे आपणास स्टार्ट नाऊ Start Now हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर आपणास आपला ऍड्रेस द्यावा लागेल.
तिथे आपणास अनेक प्रकारचे ऑप्शन्स दिसत असतील त्यापैकी रेशन कार्ड बेनिफिट्स या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. या ठिकाणी आपणास रेशन कार्ड नंबर, आधार नंबर, ईमेल एड्रेस आणि मोबाईल नंबर इत्यादी भरावे लागेल त्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो तिथे टाकावा लागेल त्यानंतर आपल्या स्क्रीन वरती प्रोसेस कम्प्लीट झाली आहे असा मेसेज दिसेल एवढे केल्यावर आपली प्रोसेस कम्प्लीट होऊन जाईल आणि आपले रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक होईल.
Share your comments