नवी मुंबई: मित्रांनो देशातील नागरिक मोठ्या प्रमाणात बचत म्हणून गुंतवणूक करत असतात. अनेकजन पेन्शन योजनेत गुंतवणूक करत असतात. मित्रांनो तुम्ही सुद्धा जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी आहे.
मित्रांनो खरं पाहता पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी व्यक्तीला वयाची साठ वर्ष पूर्ण करावी लागतात. मात्र तुम्हाला जर पेन्शन मिळवायची असेल तर त्यासाठी 60 वर्षे वाट पाहण्याची गरज नाही. कारण कि आज आम्ही तुमच्यासाठी अशा एका भन्नाट योजनेविषयी माहिती घेऊन आलो आहोत ज्या योजनेच्या माध्यमातून तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी पेन्शनचा लाभ घेऊ शकतात.
भारतीय आयुर्विमा महामंडळाने अर्थात एलआयसीने एक पॉलिसी आणली आहे ज्याद्वारे तुम्ही एक निश्चित रक्कम एकरकमी जमा करून वयाच्या 40 व्या वर्षीही पेन्शन योजनेचा लाभ मिळवू शकता. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी.
एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेअंतर्गत, पॉलिसी घेताना तुम्हाला फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागेल आणि अॅन्युइटी मिळवण्यासाठी दोन पर्यायांपैकी एक निवडावा लागेल. यानंतर, तुम्हाला एलआयसीकडून संपूर्ण आयुष्य पेन्शन मिळत राहील.
त्याचप्रमाणे, पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास एकल पॉलिसीची रक्कम त्याच्या नॉमिनीला परत केली जाते. सरल पेन्शन योजना ही एक तत्काळ वार्षिकी योजना आहे, याचा अर्थ तुम्ही पॉलिसी घेताच तुम्हाला पेन्शन मिळू लागते. ही पॉलिसी घेतल्यानंतर जेवढी पेन्शन सुरू होते तेवढीच पेन्शन आयुष्यभर मिळते.
पात्रता काय आहे
या योजनेसाठी निश्चित केलेली वयोमर्यादा किमान 40 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 80 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. ही संपूर्ण आयुष्य पॉलिसी असल्याने, पेन्शनधारक जिवंत असेपर्यंत पेन्शन संपूर्ण आयुष्यासाठी उपलब्ध आहे.
किती गुंतवणूक करावी लागेल
तुम्हाला या पेन्शन योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला दरमहा किमान 1 हजार रुपये पेन्शन म्हणून घ्यावे लागतील. तुम्ही 42 वर्षांचे असाल आणि 30 लाख रुपयांची अॅन्युइटी खरेदी केली तर तुम्हाला दरमहा 12,388 रुपये पेन्शन मिळेल.
Share your comments