देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने देशातील नागरिकांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. एलआयसी म्हणजेच लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या कन्यादान योजना अंतर्गत आपण आपल्या मुलीच्या लग्नासाठी मामुली पैसे गुंतवणूक करून तब्बल 31 लाख रुपये प्राप्त करू शकता. देशातील अनेक पालक आपल्या मुलीच्या लग्नासाठी गुंतवणूक करत असतात, त्यामुळे एलआयसीची ही योजना अशा पालकांसाठी वरदान ठरू शकते. एलआयसी मध्ये अशा अनेक योजना आहेत ज्यात आपण गुंतवणूक करून आपल्या पाल्यांच्या भविष्यासाठी मोठी धनराशी साठवून ठेवू शकता. आज आपण एलआयसीच्या अशाच एका महत्त्वाकांक्षी योजना विशेष जाणून घेणार आहोत. आज आपण एलआयसीच्या कन्यादान योजना याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
या योजनेचे उद्दिष्ट
एलआयसी कन्यादान योजना ही योजना विशेषता मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत पालक आपल्या मुलींच्या भवितव्यासाठी थोडीशी गुंतवणूक करून चांगला पैसा उभारू शकतात. ही योजना मुलींच्या भवितव्यासाठी सुरू करण्यात आली असल्याने या योजनेला कन्यादान योजना म्हणून एलआयसीने नाव दिले आहे.
कोन असणार ह्या योजनेसाठी पात्र
मित्रांनो, जर आपणास एलआयसीच्या या महत्त्वाकांक्षी योजनेत गुंतवणूक करायची असेल तर आपले वय कमीत कमी तीस वर्ष असणे अनिवार्य आहे. तसेच आपल्या मुलीचे वय एक वर्षापेक्षा कमी असता कामा नये, म्हणजे एक वर्षाहुन अधिक वय असलेल्या मुलीसाठी आपण ही योजना सुरू करू शकता. ही पॉलिसी पंचवीस वर्षाच्या टर्म साठी सुरू करण्यात आली आहे, आणि या योजनेअंतर्गत 22 वर्षापर्यंत प्रीमियम भरावा लागतो. जर आपले वय तीस वर्षांपेक्षा अधिक असेल आणि आपल्या मुलीचे वय एक वर्षाहून अधिक असेल तर आपण या योजनेसाठी पात्र असणार आहात.
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
एलआयसी च्या कन्यादान योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी आपणास अर्जदाराचे आधार कार्ड, ओळखपत्र, रहिवासाचा पुरावा, पासपोर्ट साईज फोटो, मुलीचा जन्माचा दाखला, याव्यतिरिक्त या योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी योजनेचा ॲप्लिकेशन फॉर्म, प्रीमियम भरण्यासाठी एक चेक अथवा कॅश हे कागदपत्रे जोडावी लागणार आहेत.
या योजनेअंतर्गत मिळणार 31 लाख
एलआयसीच्या कन्यादान योजनेअंतर्गत आपणास मासिक 4530 रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे. म्हणजे या योजनेअंतर्गत आपणास रोजाना केवळ 151 रुपये गुंतवणूक करण्याची गरज पडणार आहे. एलआयसी कन्यादान योजनेसाठी 22 वर्षापर्यंत प्रीमियम भरावे लागणार आहे 22 वर्षापर्यंत संपूर्ण प्रीमियम भरल्यानंतर आपणास मॅच्युरिटीच्या वेळी तब्बल 31 लाख रुपये मिळणार आहेत.
जर आपण या योजनेसाठी आपल्या वयाच्या तिसाव्या वर्षी गुंतवणूक केली तर ही योजना आहे 25 वर्षासाठीची म्हणजे जेव्हा आपले वय 55 वर्षे असेल तेव्हा आपणास या योजनेअंतर्गत 31 लाख रुपये प्राप्त होतील. या प्राप्त झालेल्या पैशांनी आपण आपल्या मुलीचा विवाह मोठ्या थाटात संपन्न करू शकता.
Share your comments