1. इतर बातम्या

शेतकऱ्यांसाठी एलआयसीची ही योजना ठरेल फायद्याची, मिळते या योजनेच्या माध्यमातून पेन्शन

एलआयसी ही विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असून भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी कडून विविध प्रकारचे आकर्षक पॉलिसी चालवल्या जातात. गुंतवणुकीसाठी एल आय सी च्या योजना खूपच फायदेशीर आणि सुरक्षित आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
lic saral pention scheme is secure in old age through get pention

lic saral pention scheme is secure in old age through get pention

एलआयसी ही विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असून भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी कडून विविध प्रकारचे आकर्षक पॉलिसी चालवल्या जातात. गुंतवणुकीसाठी एल आय सी च्या योजना खूपच फायदेशीर आणि सुरक्षित आहेत.

एलआयसी च्या बर्‍याच पॉलिसी या अनपेक्षित संकटाच्या वेळेस गुंतवणूकदारांच्या कुटुंबाला भक्कम आर्थिक साहाय्य मिळवण्यासाठी सहाय्य करतात. एलआयसीच्या एखादी पॉलिसी मध्ये गुंतवणूक करणे हे आर्थिक दृष्ट्या सुरक्षित भविष्यासाठी खूपच गरजेचे आहे. एलआयसीचे अनेक वेगवेगळे प्लान आहेत. यामध्ये एक महत्त्वाचा प्लान म्हणजे गुंतवणूकदारांनी एकदा एक प्रीमियम भरून प्रति महिना 12 हजार रुपये प्रतीमहिना मिळतात. या एलआयसीच्या योजनेचे नाव आहे सरल पेन्शन योजना हे होय. सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला गुंतवणुकीसाठी उपलब्ध पर्यायआहे. या योजनेमध्ये दोन पर्याय दिले जातात ते आपण पाहू.

नक्की वाचा:मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना ठरेल एक टर्निंग पॉइंट, मिळेल भक्कम आर्थिक मदत

 या योजनांतर्गत असलेले दोन पर्याय

 या सरल पेन्शन योजनेच्या माध्यमातूनएलआयसी दोन पर्याय देते. त्यामध्ये पहिला पर्याय म्हणजे खरेदी किमतीवर शंभर टक्के रिटर्न सह लाइफ ऍन्युइटी प्रदान करतो.

या पॉलिसी चे फायदे पर्यायातील गुंतवणूकदारा पुरते मर्यादित आहेत. यामध्ये पॉलिसीधारक जिवंत असेल तोपर्यंत मासिक पे आउट चे खात्री दिली जाते. शंभर टक्के रिटन सह  लाइफ ऍन्युइटी मध्ये दुर्दैवी घटना घडल्यास असलेल्या नॉमिनी ला प्रीमियम प्राप्त होतो. या योजनेअंतर्गत दुसरा पर्याय म्हणजे संयुक्त जीवन पेन्शन योजनाहा होय. यामध्ये पती आणि पत्नी दोघांनाही मासिक पेन्शन मिळते. दोघांचाही मृत्यू झाल्यास असलेल्या नोंदणीला आधारभूत किंमत मिळते.

 सरल पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये

1-पॉलिसीधारक पॉलिसीमध्ये ऑनलाइन किंवा ऑफलाईन  दोन्ही प्रकारे गुंतवणूक सुरू करू शकतात.

2-एलआयसी सरल पेन्शन योजनेच्या माध्यमातून पेन्शन पॉलिसी मध्ये एक वेळ गुंतवणूक केल्यानंतर लगेच सुरू होते.

नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी योजना! मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे ही योजना

3-यामध्ये पॉलिसीधारकमासिक,त्रैमासिक,सहामाई किंवा वार्षिक पेन्शन प्राप्त करणे निवडू शकतात.

4- पॉलिसीधारक एलआयसी सरल पेन्शन योजनेत चाळीस वर्षे ते ऐंशी वर्षं पर्यंत गुंतवणूक करू शकतात.

5-पॉलिसीधारक त्यांच्या गुंतवणुकीवर पॉलिसी सुरू होण्याच्या तारखेपासून सहा महिन्यानंतर कधीही कर्ज घेऊ शकतात.

English Summary: lic saral pention scheme is secure in old age through get pention Published on: 21 April 2022, 01:33 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters