LIC ने एक उत्तम योजना सुरू केली आहे. ज्यामध्ये तुम्ही आता वयाच्या 40 व्या वर्षी देखील 50 हजारांपर्यंत पेन्शन घेऊ शकता. या पॉलिसीमध्ये (policy) एकरकमी रक्कम जमा करावी लागेल. ज्यामध्ये तुम्ही दरमहा पेन्शन रकमेचा पर्याय निवडू शकता. 3 महिने 6 महिने किंवा वर्षभरात पेन्शन रक्कम घेऊ शकता.
आत्तापर्यंत एखाद्याला 60 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ पेन्शन मिळत असे. मात्र आता पेन्शन मिळण्यासाठी एवढी प्रतीक्षा करावी लागणार नाही. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (Life Insurance Corporation) ने अलीकडे एक नवीन पॉलिसी लाँच केली आहे. ज्या अंतर्गत तुम्ही एकरकमी रक्कम जमा करताच तुम्हाला वयाच्या 40 व्या वर्षी पेन्शन मिळू लागते. सरल पेन्शन योजनेविषयी बोलत आहोत.
सरल पेन्शन योजना कोण घेऊ शकते?
या योजनेच्या लाभासाठी किमान वयोमर्यादा 40 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 80 वर्षे आहे. ही एक आजीवन पॉलिसी आहे, जोपर्यंत पेन्शनधारक जिवंत आहे तोपर्यंत पेन्शन आयुष्यभर उपलब्ध असते. सरल पेन्शन पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर कधीही सरेंडर (serender) केली जाऊ शकते.
विशेष म्हणजे पेन्शन कधी मिळणार, हे पेन्शनधारकांनी ठरवायचे आहे. यामध्ये तुम्हाला 4 पर्याय मिळतात. तुम्ही दर महिन्याला, दर तीन महिन्यांनी, दर 6 महिन्यांनी पेन्शन घेऊ शकता किंवा 12 महिन्यांनी घेऊ शकता. तुम्ही कोणताही पर्याय निवडाल त्या कालावधीत तुमची पेन्शन येण्यास सुरुवात होईल.
सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात होणार मोठी वाढ; जाणून घ्या आजचे भाव
इतकी पेन्शन मिळणार
जर तुम्हाला दरमहा पेन्शन हवी असेल तर तुम्हाला किमान 1000 रुपये पेन्शन, तीन महिन्यांसाठी 3000 रुपये, 6 महिन्यांसाठी 6000 रुपये आणि 12 महिन्यांसाठी 12000 रुपये पेन्शन घ्यावे लागेल. यासाठी कमाल मर्यादा नाही.
तुम्ही 40 वर्षांचे असाल आणि तुम्ही 10 लाख रुपयांचा सिंगल प्रीमियम जमा केला असेल, तर तुम्हाला वार्षिक 50, 250 रुपये मिळू लागतील जे आयुष्यभर उपलब्ध असतील. जर तुम्हाला तुमची ठेव मध्यभागी परत हवी असेल, तर 5 टक्के वजा केल्यावर तुम्हाला ठेवीची रक्कम परत मिळते.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांनो पपई लागवडीसाठी ऑक्टोबर महिना सर्वोत्तम; कमवू शकता लाखों रुपयांमध्ये उत्पन्न
फक्त 2 मिनिटांत ब्लड प्रेशर, तणाव आणि वेदनांपासून मिळणार आराम; फक्त हे एकच काम करा
'लम्पी स्कीन'ने दगावलेल्या जनावरांसाठी मिळणाऱ्या मदतीमध्ये बदल; मिळणार इतकी रक्कम
Share your comments