एलआयसी विमा क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य कंपनीआहे. एलआयसीच्या माध्यमातून नेहमी प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी वेगवेगळ्या पॉलिसी प्लॅन बाजारात आणल्या जातात.ज्यामुळे भविष्यकाळ हा सुरक्षित होण्यास मदत होते.एलआयसीने अशीच एक पॉलिसी खास मुलींसाठीआणली आहे.या लेखात आपणपॉलिसी विषयी सविस्तर माहिती घेऊ.
एलआयसी ची कन्यादान पॉलिसी
कुटुंबात मुलीचा जन्म झाला म्हणजे कुटुंबातील लोकांना सगळ्यात जास्त चिंता वाटत असेल ती त्याच्या शिक्षणाची आणि लग्नाच्याखर्चाची. यावर एलआयसीने एक उत्तम प्रकारची योजना आणली आहे. त्या योजनेचे नाव आहे एलआयसी कन्यादान पॉलिसीहे होय. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्चाचे उत्तम प्रकारची नियोजन व भविष्यकालीन आर्थिक तरतूद करू शकतात. या पॉलिसीच्या माध्यमातून तुमच्या मुलीला भविष्यकालीन पूर्ण आर्थिक स्वातंत्र्य तर मिळतेचशिवाय तुमच्या मुलीला आर्थिक स्थैर्य देखील प्राप्त होते.विशेष म्हणजे या पॉलिसी च्या माध्यमातूनमुलीला पूर्ण आयुष्यभर आर्थिक स्वातंत्र्य तर मिळतेच शिवाय लग्न केल्यानंतर देखील मदत मिळते.
कन्यादान पॉलिसी चे फायदे
1-विशेष म्हणजे या पॉलिसीमध्ये प्रीमियम भरण्याचा कालावधी मर्यादित आहे.
2- तुम्ही जितक्या कालावधीचा पॉलिसी प्लॅन घेतला असेल त्यापेक्षा तीन वर्ष कमी प्रीमियम भरावा लागतो.
-पॉलिसी भरण्यासाठी तुमच्याकडे मासिक,तिमाही,सहामाही आणि वार्षिक पर्याय उपलब्ध आहेत.
4- जरा पॉलिसी धारकाचा पॉलिसीचा कालावधी दरम्यान मृत्यू झाला तर विमा रकमेच्या 10 टक्के रक्कम प्रत्येक वर्षी मॅच्युरिटी तारखेच्या आत एक वर्ष आधीच दिली जाते.
5- ही पॉलिसी तेरा ते पंचवीस वर्षेकालावधीची आहे.
6- मुलीच्या वडिलांचा मृत्यू पॉलिसीचा कालावधी निर्माण झाल्यास संबंधित कुटुंबाला आर्थिक लाभ दिला जातो.
7- ही पॉलिसी मुलींना आर्थिक मदत तर देतेच पण त्यासोबतच या योजनेमध्ये आई वडिलांचा मृत्यू झाला तर
एलआयसी कन्यादान पॉलिसी चे वैशिष्ट्य
1-जर मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला तर प्रीमियम भरण्याची आवश्यकता नाही.
2- आकस्मित मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये तात्काळ मिळतात.
3-वडिलांचे निधन आकस्मित नसले तरी पाच लाख रुपये मिळू शकतात.
4-मॅच्युरिटी च्या तारखेपर्यंत दरवर्षी पन्नास हजार रुपये मिळतात.
एलआयसीच्या कन्यादान पॉलिसी साठी ची पात्रता
1-या पॉलिसी अंतर्गत फक्त मुलीच्या वडिलांना किंवा मुलीला गुंतवणूक करता येते.
2-
या पॉलिसीसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे व कमाल वयोमर्यादा पन्नास वर्षआहे.
3- पॉलिसी घेताना मुलीचे वय किमान एक वर्ष असले पाहिजे.
4-मॅच्युरिटी च्या वेळेस किमान विमा रक्कम एक लाख रुपये आहे.
5-एलआयसी कन्यादान पॉलिसीचा कालावधी हा तेरा ते पंचवीस वर्षे आहे.
Share your comments