
lic jivan tarun policy
लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात एलआयसी गुंतवणुक क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी असून समाजातील प्रत्येक घटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक प्लान एलआयसी कायमच बाजारात आणत असते.
प्रत्येकाची गुंतवणुक करण्यामागे इच्छा असते की आपण केलेली गुंतवणूक ही सुरक्षित आणि भविष्यात चांगला परतावा देणारी ठरावी व अशाच पर्यायांचा जास्त करून गुंतवणुकीसाठी लोकांकडून विचार केला जातो.
यामध्ये एलआयसी अग्रगण्य आहे. असाच एक एलआयसीने मुलांच्या शैक्षणिक आणि आर्थिक उज्वल भविष्यासाठी एक पॉलिसी आणली आहे. या पॉलिसी विषयी सविस्तर माहिती या लेखात घेऊ.
एलआयसीची जीवन तरूण पॉलिसी
प्रत्येक पालकाची इच्छा असते की, मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे. परंतु उच्च आणि दर्जेदार शिक्षणासाठी पैसा देखील त्याप्रमाणेच लागतो.
नक्की वाचा:धनसंचय :LIC ने लॉन्च केली नवीन पॉलिसी, मिळेल एक वेळच्या गुंतवणुकीत नियमित उत्पन्न
अगदी सुरुवातीला शिक्षणाच्या खर्चाचा विचार केला तर तो फारसा नसतो. परंतु कालांतराने अफाट वाढतो. बऱ्याचदा आर्थिक परिस्थितीमुळे मुलांना शिक्षणाशी तडजोड करावी लागते.
अशा सगळ्या परिस्थितीत जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैशांची कमतरता भासू नये असं वाटत असेल तर एल आय सी जीवन तरुण पॉलिसी खूप महत्त्वाची आणि भविष्यकालीन फायद्याचे ठरेल.
या पॉलिसीचे वैशिष्ट्य
जीवन तरुण पॉलिसी एक सहभागी,नॉन लिंक्ड मर्यादित प्रीमियम पेमेंट योजना आहे.मुलांचे शिक्षण आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आली आहे.या एकाच पॉलिसिच्या माध्यमातून मुलांना बचत आणि त्यांना विम्याचे संरक्षण हे दोघेही फायदे दिले जातात.
या माध्यमातून तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या लग्नाच्या खर्चासाठी पैसे काढू शकता, अशा पद्धतीने ही पॉलिसी चा प्लान बनवण्यात आला आहे.
नक्की वाचा:Business Idea 2022 : या व्यवसायात गुंतवणूक करा अन कमवा लाखों, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
या पॉलिसीचा मॅच्युरिटी पिरेड हा पंचवीस वर्षाचा असून मुल पंचवीस वर्षाचे झाल्यावर पॉलिसी ही मॅच्युरिट होते.
जेव्हा तुम्ही पॉलिसी घ्याल त्या वेळी जर मुलाचे वय दहा वर्षे असेल तर पॉलिसी पंधरा वर्षांनी परिपक्व होईल. तुम्ही तुमच्या गरजेनुसार या योजनेत गुंतवणूक करू शकता. एक वर्षाचे होईपर्यंत तुम्हाला या पॉलिसीत प्रीमियम भरावा लागेल आणि जेव्हा मूल पंचवीस वर्षाचे होईल तेव्हा तुम्हाला मॅच्युरिटी रक्कम मिळेल.
यामध्ये जर तुम्ही प्रीमियम पेमेंट सुरू करताना तुमचे मूल बारा वर्षाचे असल्यास पॉलिसीची मुदत 13 वर्षांची असेल आणि किमान विमा रक्कम पाच लाख रुपये असेल. जर तुम्ही दिवसाकाठी दीडशे रुपये बचत केली तर तुमचा वार्षिक प्रिमियम सुमारे 55 हजार रुपये असेल.
तुमची आठ वर्षातील एकूण गुंतवणूक 4 लाख 40 हजार 665 रुपये होईल. यावर तुम्हाला दोन लाख 47 हजार रुपयांचा बोनस मिळेल.
त्यावेळी तुमची विमा रक्कम पाच लाख रुपये असेल. एवढेच नाही तर 97 हजार 500 रुपयांचा रॉयल्टी मिळणार आहे. अशाप्रकारे एकूण आठ लाख 44 हजार पाचशे रुपये तुम्हाला उपलब्ध होतील.
नक्की वाचा:तुम्ही जीवन विमा पॉलिसी घेत आहात का? तर 'या' गोष्टींकडे ठेवा लक्ष
Share your comments