1. इतर बातम्या

सरकारी तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवीनतम दर जाहीर! जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे दर...

Petrol Diesel Price Today: गेल्या काही दिवसांपासून देशात महागाई वाढतच चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहेत. गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोसळत आहे. त्यातच आता सर्वसामान्यांना छोटासा दिलासा म्हणजे पेट्रोल डिझेलच्या दरात आजही कोणता बदल करण्यात आला नाही.

petrol today rate

petrol today rate

Petrol Diesel Price Today: गेल्या काही दिवसांपासून देशात महागाई वाढतच चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे हाल होत आहेत. गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोसळत आहे. त्यातच आता सर्वसामान्यांना छोटासा दिलासा म्हणजे पेट्रोल (Petrol) डिझेलच्या (Diesel) दरात आजही कोणता बदल करण्यात आला नाही.

भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) मंगळवारीही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. अशाप्रकारे आज सलग 81 वा दिवस आहे जेव्हा देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महागाईच्या आघाडीवर आजही सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी आली आहे.

तर आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत सातत्याने घसरण सुरू आहे. सध्या, ब्रेट क्रूड प्रति बॅरल सुमारे $100 आहे.

कांद्याने शेतकऱ्यांना रडवले! 15 ते 18 रुपये उत्पादन खर्च मात्र कांद्याला कवडीमोल भाव

यापूर्वी 21 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे.

यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली. सध्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

त्याचबरोबर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

कारल्याच्या या वाणांची अशा पद्धतीने करा शेती! होईल बंपर कमाई; जाणून घ्या...

इथे सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल मिळते

पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल (Cheapest petrol) आणि डिझेल (Cheapest Diesel) विकले जात आहे. जिथे पेट्रोल 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे.

त्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेल महागले आहे

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी (Excise duty), डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते. परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलतात.

महत्वाच्या बातम्या:
खुशखबर! राखीपौर्णमेच्या मुहूर्तावर 10 ग्रॅम सोने खरेदी करा फक्त 30528 रुपयांना; जाणून घ्या नवे दर...
देशातील या भागांना आज मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड अलर्ट जारी

English Summary: Latest fuel prices announced by government oil companies! Published on: 09 August 2022, 09:57 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters