शेतकऱ्यांसाठी केंद्र तसेच राज्य सरकार नेहमी कोणत्या न कोणत्या योजना राबवत असते. मग त्या शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी असो किंवा नुकसानभरपाईसाठी. यामधील एक योजना म्हणजे स्व. गोपीनाथ मुंडे अपघात योजना. शेतकऱ्याचा मृत्यू झाला की त्याच्या वारसाला २ लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून केली जाते. तो शेतकरी हा घरचा मुख्य पुरुष असतो जो की तो गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून या रकमेचा उपयोग होतो. अमरावती जिल्ह्यातील १६ शेतकऱ्यांना ३२ लाख रुपयांची मदत भेटली आहे. मागील ७ वर्षांपासून ही योजना राबविण्यात आली आहे. ज्यावेळी तुम्ही कृषी विभागाकडे अर्ज करता त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटतो.
असा मिळवा योजनाचा लाभ :-
राज्यातील सर्व सातबारा शेतकऱ्यांचा विमा हप्ता शासनामार्फत भरला असून दोन लाख रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे. या विम्याचा लाभ १० ते ७५ वयोगटातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. ज्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे त्याचा सातबारा असणे गरजेचे आहे. अपघात झाल्यानंतर पोलिस पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट, सातबारा, आठ ‘अ’, 6 क, 6 ड, मृत्यृ प्रमाणपत्र तसेच त्याच्या वारसाचे प्रमाणपत्र, वारसा अर्जदार इ. सर्व कागदपत्रे कृषी विभागात जमा करावी लागणार आहेत. कृषी विभागाने ज्या विमा कंपन्यांची नियुक्ती केली आहे ती कंपनी या कागदपत्रांची पूर्तता करते. नंतर सर्व चौकशी होऊन त्या शेतकऱ्याच्या कुटुंबास विमा रक्कम अदा केली जाते.
कोरोनामुळे योजनेली खीळ :-
कोरोनाचा परिणाम हा शासकीय योजनांवर झालेला होता, जे की ज्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे त्याच्या कुटुंबास मदत भेटण्यास उशीर झाला. अमरावती जिल्ह्यातील १६ शेतकरी कुटुंबाला रक्कम मिळाली आहे. तर अजून १०५ शेतकऱ्यांचे अर्ज पेंडिंग वर आहेत. आता कुठे तरी निधी देण्यास सुरुवात झालेली आहे. तसेच जे राहिलेले शेतकरी आहेत त्यांची सुद्धा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच त्यांना रक्कम मिळणार आहे.
असे आहे मदतीचे स्वरुप :-
शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला असेल किंवा अपघातात दोन डोळे किंवा दोन अवयव निकामी झाले असतील तर त्यांना २ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. तसेच जर एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाला असेल तर एक लाख रुपयांची मदत केली जाणार आहे.
Share your comments