
construction labour
समाजातील विविध समाज घटकांच्या उन्नतीसाठी केंद्रसरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना अमलात आणत आहेत.जेणेकरून लोकांचे जीवन सुसह्य वावे व त्यांचे आर्थिक प्रगती व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. असंघटित क्षेत्रामध्ये बरेच मजूर काम करीत असतात.
अशा असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांनात्यांच्या वयाच्या साठ वर्षानंतर त्यांना त्यांचा उदरनिर्वाह करणे सोपे जावे यासाठी केंद्र सरकारने एक पेन्शन योजना सुरू केली आहे. योजनेचे नाव आहेस प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना हे होय.या योजने अंतर्गत विटभट्टीत काम करणारे मजूर, पादत्राणे बनवणारे,कचरा वेचणारे, घरगुती कामगार तसेच कपडे धुणारे, रिक्षा चालक, जमीन असलेले मजूर, बिडी कामगार आणि रोजंदारी कामगार यांना या योजनेच्या माध्यमातून पेन्शन देण्यात येणार आहे. तसेच मासिक 15 हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मजुरांना देखील या योजनेत समाविष्ट केली जाईल. या योजनेअंतर्गत ज्या मजुरांचे वयाची साठ वर्षे पूर्ण झाली आहेत अशा मजुरांना मासिक तीन हजार रुपयांपर्यंत पेन्शन देण्याची ही योजना आहे.
या दरम्यान पेन्शनधारकांचा मृत्यू झाल्यास पेन्शनच्या 50 टक्के रक्कम त्यांच्या जोडीदाराला दिली जाईल.
या योजनेचा लाभ घेण्याची पद्धत
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना चा लाभ ज्यांना घ्यायचा असेल अशा मजुरांना नोंदणी करावी लागते. एका आकडेवारीनुसार देशात असंघटित क्षेत्रात सुमारे 42 कोटी मजूर काम करतात.यामध्ये या मजुरांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा मजुरांची वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे आणि साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांना दरमहा 55 ते दोनशे रुपयांपर्यंतगुंतवणूक करावी लागते.जेव्हा संबंधित कामगाराचे वय 60 वर्षे पूर्ण होते तेव्हा सरकारकडून पेन्शन सुरू होते.
या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://www.maandhan.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे.
- त्यानंतर सेल्फ एंरोलमेंट वर क्लिक करावे आणि तुमचा मोबाईल नंबर टाकावा.
- त्यानंतर प्रोसीड वर क्लिक करावे.
- त्यानंतर तुमचे नाव, ई-मेल आणि कॅपच्या कोड एंटर करावा आणि जनरेट ओटीपी वर क्लिक करावे.
- त्यानंतर ओटीपी सत्यापित करावा. नंतर अर्धा चे एक पान तुमच्यासमोर उघडेल. त्यामध्ये आवश्यक ती माहिती नोंदवावी आणि अर्ज सबमिट करावा.
Share your comments