देशातील शेतकऱ्यांना विजेच्या अनियमिततेचा जो फटका बसत असतो. यामुळे शेतातील पिके करपून जात असतात परिमाणी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असते. त्यावर शाश्वत उपाययोजना म्हणून केंद्रसरकारकडून कुसूम योजना चालवली जाते. यामध्ये अपारंपारिक संसाधनांच्या सहाय्याने वीज निर्मितीवर सरकारचा भर दिला जातो. या कुसूम योजनेत सौर उर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चोवीस तास वीज उपलब्ध करून देण्याचे सरकारचे धोरण आहे.
केंद्र सरकार अर्थसंकल्पांतर्गत केलेल्या घोषणेप्रमाणे २०२०-२०२१ मध्ये कुसुम योजनेच्या माध्यमातून २० लाख सौरपंपांना अनुदान देणार आहे. यामुळे डिझेल वापराबरोबरच कच्च्या तेलाच्या आयातीसाठी सरकारला करावा लागणारा खर्चही कमी होईल. किसान ऊर्जा सुरक्षा आणि उन्नती अभियान (कुसुम) योजनेंतर्गत केंद्र सरकारने सौर ऊर्जेसह देशभरात सिंचनासाठी वापरलेले सर्व डिझेल / इलेक्ट्रिक पंप चालवण्याच्या दृष्टीने ही योजना आखली आहे.
केंद्र सरकारच्या कुसुम योजनेचा फायदा देशातील शेतकऱ्यांना दोन प्रकारे होणार आहे. अतिरिक्त वीज बनवून शेतकरी ती ग्रीडला पाठवू शकतील. या माध्यमातून त्यांचे उत्पन्न वाढेल. शेतकऱ्यांना सौर उर्जा उपकरणे बसविण्यासाठी केवळ १० टक्के रक्कम द्यावी लागेल. उर्वरित रक्कम केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान म्हणून देण्यात येईल. कुसुम योजनेंतर्गत बँका ३० टक्के रक्कम शेतकऱ्यांना कर्ज म्हणून देतील. तर सरकार सौर पंपाच्या एकूण खर्चाच्या ६०% रक्कम अनुदान म्हणून देईल.
असा करा अर्ज
१) अर्जदाराने आधी अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ https://www.mahadiscom.in/solar/ वर जावे.
२) त्यानंतर होम पेजवर अर्ज करण्यासाठी क्लिक करा.
३) आता तुम्हाला कुसुम योजनेचा फॉर्म दिसेल.
४) अर्जदारास त्याची वैयक्तिक माहिती या फॉर्ममध्ये भरावी लागेल, जसे की त्यांची वैयक्तिक माहितीः – मोबाइल नंबर, ईमेल आयडी आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
५) ऑनलाईन अर्ज पूर्ण झाल्यावर तुम्हाला कुसुम योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करावे लागेल.
६) आता भरलेला फॉर्म https://mnre.gov.in/ सब्मिट करावा लागेल.
Share your comments