शेतकरी, शेती आणि कृषी सेवा केंद्र यांचा एक घनिष्ठ संबंध आहे. शेतीसाठी बियाणे,रासायनिक खते तसेच विविध प्रकारचे कीटक नाशके हे सगळे मिळण्याचे ठिकाण म्हणजेच कृषी सेवा केंद्र होय हे आपल्याला माहिती आहे. परंतु जर तुमच्याकडे शिक्षण आहे,एखाद्या व्यवसायामध्ये पडायचीयोजना आहे
तुम्ही स्वतःच्या गावात कृषी सेवा केंद्र सुरू करून एक चांगला व्यवसाय विकसित करू शकतात व त्याद्वारे तुमची चांगली आर्थिक प्रगती व्हायला देखील मदत होईल. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी व नियम तसेच अटी याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
अगोदर पाहू कृषी सेवा केंद्राचे महत्व
कृषी सेवा केंद्र सुरू करण्या अगोदर या व्यवसायाचे महत्त्व आपण काहीमुद्द्यांच्या आधारे जाणून घेऊ.
- कृषीसेवा केंद्राचा व्यवसाय म्हटला म्हणजे ग्रामीण भागातला सर्वात मोठा आर्थिक उलाढाल होणारा व्यवसाय असून शेतीशी निगडित आहे.
- स्वतःची शेती सांभाळून उत्तम प्रतीचा व्यवसाय संधी उच्चशिक्षित तरुणांना ग्रामीण भागात या व्यवसायामुळे मिळते.
- कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय जर यशस्वी करायचा असेल तर उत्तम सेवा ही फार महत्त्वाचे आहे.त्यासोबतच योग्य आणि परिणामकारक कृषी सल्लाआणि क्षेत्रभेट या त्रिसूत्रीचा वापर केला तर हा व्यवसाय खूप पुढे जाऊ शकतो.
कृषी सेवा केंद्र सुरू करणे अगोदर या गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे…
- कुठल्याही व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याचे लोकेशन उत्तम असणे फार गरजेचे आहे.हीच बाब कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी सुद्धा लागू पडते.
- शेतीचे प्रमाण आणि शेतकरी बांधवांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असलेल्या क्षेत्रात हा व्यवसाय सुरू करावा.
- तसेच स्वतःचा चांगला जनसंपर्क,उत्कृष्ट संवाद कौशल्य व शेती संबंधित असलेले भरपूर ज्ञान या प्राथमिक बाबी खूप महत्त्वाचे आहेत.
अर्ज कुठे करावा?
1-महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर जाऊन संपूर्ण फॉर्म भरावा.
2- याच संकेतस्थळावर ऑनलाईन फी सुद्धा भरावी लागते.
- त्यासोबत तुमच्या जवळील कॉमन सर्विस सेंटर किंवा आपले सरकार केंद्रावर सुद्धा हा फॉर्म भरून मिळतो.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
1-तुम्हाला या व्यवसायासाठी अर्ज करायचा असेल तर कृषी पदविका, कृषी पदवी ( सर्व शाखा), रसायनशास्त्र विषयात पदवी प्राप्त केलेली असणे गरजेचे आहे.
2- कृषी पदवी मध्ये समाविष्ट असलेल्या आठ पदव्यांना समान दर्जा प्राप्त आहे त्यामुळे सर्व कृषी पदवीधर यासाठी पात्र आहेत.
अर्ज करताना लागणारे आवश्यक कागदपत्रे…
- ऑनलाइन फॉर्म
- ऑनलाइन चलन प्रिंट
- आवश्यक सगळी शैक्षणिक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- जागेचा उतारा व नकाशा
- ग्रामपंचायत तसेच नगर पंचायत कडून मिळालेला ना हरकत प्रमाणपत्र
- जर भाड्याने जागा घेत असाल तर जागेचे भाडे करार पुरावा
- कॅरेक्टर सर्टिफिकेट
- ज्या कंपनीचे उत्पादन तुम्ही विक्री करणार आहात त्या कंपनीकडून मिळालेले प्रिन्सिपॉल सर्टिफिकेट
- वेळोवेळी एखाद्या वेळेस कागदपत्रांमध्ये बदल होऊ शकतो याची काळजी घ्यावी.
कागदपत्र कुठे जमा करावीत?
1-सर्व कागदपत्रे आणि ऑनलाईन फॉर्म,त्याची झेरॉक्स प्रततालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जमा करावे.
लागणारे आवश्यक परवाने
1-कृषी सेवा केंद्र सुरू करण्याअगोदर बियाणे विक्री परवाना,खत विक्री परवाना,कीटकनाशक विक्री परवाना असे तीन महत्त्वाचे परवाने असणे गरजेचे आहे.
2- हे परवाने काढण्यासाठी ऑनलाईन फॉर्म मध्ये अर्ज करावा लागतो तसेच तीनही परवान्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने स्वतंत्र शुल्क भरावे लागते.
लागणारे शुल्क
- नवीन बियाणे परवाना एक हजार रुपये
- नवीन खते विक्री परवाना मिळवण्यासाठी रिटेलर साडेचारशे रुपये आणि होलसेलर साठी दोन हजार 250 रुपये
- नवीन कीटकनाशक विक्री परवाना साठी साडेसात हजार रुपये शुल्क लागते.
Share your comments