महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती यादी मध्ये नाव असूनही जे शेतकरी कर्जमुक्ती पासून वंचित राहिलेले आहेत त्या वंचित शेतकऱ्यांसाठी मागील काही दिवसांपासून एक आवाहन केले जात आहे. त्या वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे यासाठी एक महिन्याच्या कालावधी दिलेला आहे. कर्ज माफी होणार यासाठी ग्रामीण (rurral)भागात शेतकऱ्यांची आधार प्रमाणिकरन घेण्यास गडबड सुरू आहे. आधार प्रमाणीकरण करणे म्हणजे नक्की काय? हे आपण जाणून घेणार आहोत.
एक महिन्याच्या कालावधी:
१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे त्या शेतकऱ्यांसाठी ही योजना शासनाने सुरू केली होती. परंतु राज्य सरकारकडे पैशांचा तुडवडा पडल्यामुळे शेतकरी कर्जमुक्ती पासून वंचित राहिले आहेत. आता आधार प्रमाणीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांना एक महिन्याच्या कालावधी दिलेला आहे. जे शेतकरी (farmer) वेळेत आधार प्रमाणीकरण करणार आहेत त्यांनाच कर्जमुक्ती चा लाभ घेता येणार आहे.
काय आहे आधार प्रमाणीकरण?
१. कोणतेही शासकीय काम करायचे असेल तर त्यास आधार कार्ड महत्वाचे ठरते. आधार प्रमाणीकरण करणे म्हणजे थोड्यात आधार कार्ड अपडेट करणे.
२. अनेक लोकांच्या आधार कार्ड मध्ये त्रुटी आहेत मात्र लोक तिकडे लक्ष देत नाहीत. कर्जमुक्ती मध्ये नाव आले तर तुम्हाला आधार दुरुस्ती करावी लागेल.
३. आधार अपडेट करायचे असेल तर तुम्हाला आधार केंद्रावर जावे लागेल आणि तिथे जाऊन चुका सांगाव्या लागतील. आधार अपडेट करण्यास एक प्रूफ द्यावा लागेल जसे की शाळा सोडल्याचा दाखल, मतदान कार्ड किंवा पॅनकार्ड.
४. आधार कार्ड वर फक्त जन्माची साल नाहीत तर पूर्ण जन्मतारीख असणे अनिवार्य आहे.
महिन्याभराची मोहीम:
आधार प्रमाणीकरण करण्याची मोहीम १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान केली गेली आहे जो की हा कालावधी शासनाने ठरवून दिलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नाही त्या शेतकऱ्यांची यादी शाळा, ग्रामपंचायत ठिकानी लावली जाणार आहे.
Share your comments