शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेतर्फे वर्षातून दोन हजार रुपये असे तीन वेळा दिले जातात म्हणजेच सहा हजार रुपये देतात, या योजनेचा दुसरा हप्ता लवकरच जमा होईल असे सांगण्यात आले आहे पण या योजनेमध्ये सारखे सारखे बदल करण्यात येत आहेत.
शेतकरी अधिक सोयीस्कर व्हावे म्हणून सरकार नेहमी प्रयत्नशील असते, आज आपण जाऊन घेणार आहोत की या योजनेमध्ये कोणते नवीन बदल झाले आहेत.पंतप्रधान किसान योजना साठी शेतकऱ्यांना नोंद करण्यासाठी पाहिले सरकारी कार्यालयामध्ये जावे लागत होते ते अत्ता होणार नाही कारण सरकारने नोंद करण्यासाठी अत्ता पोर्टल पर्याय दिला आहे. म्हणजे शेतकरी अत्ता घरी बसून आपले नाव नोंदवतील.
हेही वाचा:प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी 15 जुलै अंतिम मुदत : दादाजी भुसे
तुमच्याकडे या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे जसे की आधारकार्ड, मोबाईल क्रमांक व बँक अकाउंट नंबर असेल तर तुम्ही https://pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन जो फॉर्म दिसेल त्याच्या कॉर्नरवर पहिला पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून नाव नोंदवू शकता.याआधी ज्या शेतकऱ्यांची २ एकर पेक्षा कमी जमीन होती त्यांनाच या योजनेचा लाभ होत होता पण अत्ता सरकारने या योजनेत बदल करून हा जुना नियम रद्द केला आहे त्यामुळे अत्ता जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ भेटला जाईल.या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड कम्पलसरी केले आहे त्यामुळे जे शेतकरी या योजनेशी आधारकार्ड जोडतील त्यांना हा लाभ घेता येईल तसेच तुम्ही वरील दिलेल्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुमच्या आधारकार्ड मध्ये असणाऱ्या चुका दुरुस्त करू शकाल.
तसेच या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचे स्टेटस पाहू शकता जे की पैसे जमा झाले आहेत की नाही तिथे एक पर्याय सुद्धा दिला आहे त्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर किंवा बँक अकाउंट नंबर टाकून स्टेटस पाहु शकता.सरकारने योजनेशी किसान क्रेडिट कार्ड सुद्धा जोडले आहे त्यामुळे शेतकरी किसान क्रेडिट कार्ड अगदी सहज बनवू शकतात. तसेच ज्यांना पीएम-किसान सन्मान निधी भेटत आहे त्यांना अजून एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही म्हणजेच शेतकरी मानधन योजनेसाठी किसान सन्मान निधीमधूनच पैसे घेऊ शकतात.
Share your comments