1. इतर बातम्या

काय आहे मास्क आधारकार्ड, जाणुन घ्या ह्याचे फायदे, असे करा डाउनलोड

मित्रांनो भारतात 28 जानेवारी 2009 ला काँग्रेस सरकारच्या काळात आधार कार्डची सुरवात करण्यात आली. तेव्हापासून ते आजपर्यंत ह्या आधारचे महत्व दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आधार कार्ड सर्व सरकारी निमसरकारी कामासाठी एक महत्वाचे दस्ताऐवज आहे. बँक खाते ओपन करण्यासाठी, ओळखीच्या पुराव्यासाठी, पैशाच्या व्यवहारासाठी, आधार कार्ड एक महत्वाचे कागदपत्र आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
mask adhaar card

mask adhaar card

मित्रांनो भारतात 28 जानेवारी 2009 ला काँग्रेस सरकारच्या काळात आधार कार्डची सुरवात करण्यात आली. तेव्हापासून ते आजपर्यंत ह्या आधारचे महत्व दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आधार कार्ड सर्व सरकारी निमसरकारी कामासाठी एक महत्वाचे दस्ताऐवज आहे. बँक खाते ओपन करण्यासाठी, ओळखीच्या पुराव्यासाठी, पैशाच्या व्यवहारासाठी, आधार कार्ड एक महत्वाचे कागदपत्र आहे.

सरकारच्या नवनवीन योजनाचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. पण जसजसे ह्या डॉक्युमेंटचे महत्व वाढत आहे तसतसे ह्या डॉक्युमेंटचा चुकीचा वापर करून धोकाधडी करण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे ह्यांचा उपयोग करताना काळजी बाळगणे महत्वाचे आहे.

 काय आहे मास्क आधार कार्ड?

आधार कार्ड एक महत्वाचे दस्ताऐवज आहे. भारतात आधार कार्ड सर्व पात्र व्यक्तीसाठी अनिवार्य आहे. ह्याशिवाय भारतात कुठल्याही सरकारी योजनाचा लाभ घेता येत नाही. आधार कार्डच्या ह्या महत्वामुळे ह्याचा वापर योग्य पद्धत्तीने करायला हवा. आता तर मास्क आधार देखील उपलब्ध करण्यात आले आहे. मित्रांनो मास्क आधार कार्ड मध्ये आपले सुरवातीचे 8 नंबर हे लपवलेले असतात. ह्या सुरवातीच्या आकड्यावर Xxxx-Xxxx अशा प्रकारच्या चुकीच्या फुल्या असतात. उर्वरित 4 आकडे हे नमूद केलेले असतात. मास्क आधार कार्ड काढणे खुप सोपे आहे त्यासाठी आपणास UIDAI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागते.

वेबसाईट ला भेट दिल्यानंतर आपल्याला आपली माहिती भरावी लागते त्यानंतर हे मास्क आधार कार्ड आपल्याला प्राप्त होते. हे मास्क आधार कार्ड आपल्याला डाउनलोड करावे लागते. आपल्या रेग्युलर आधारवर संपूर्ण नंबर आपल्याला पाहवयास मिळतो पण ह्या मास्क आधार कार्ड वर सुरवातीचे 8 आकडे हे लपवलेले असतात.

मास्क आधार डाउनलोड करण्याची प्रोसेस

»मास्क आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्व्यात आधी UIDAI च्या ह्या https://uidai.gov.in/  अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

»वेबसाईट वर गेल्यानंतर तिथे आधार/विआयडी/नॉमिनेशन आयडी हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

»ह्यानंतर मास्क आधार कार्डच्या ऑप्शन वर क्लिक करा.

»तिथे नमूद केलेली माहिती व्यवस्थित भरा.

 

»माहिती भरल्यानंतर रिक्वेस्ट ओटीपी ह्या पर्यायावर क्लिक करा.

»तुमचा जो मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक असेल त्या मोबाईल नंबर वर आपल्याला एक ओटीपी प्राप्त होईल.

»ओटिपी टाकल्यानंतर अजून काही माहिती भरावी लागेल. ती व्यवस्थित भरा.

»त्यानंतर आधार डाउनलोड करा ह्या पर्यायावर क्लिक करा आणि आपले मास्क आधार कार्ड डाउनलोड करा.

 मास्क आधार कार्ड हा pdf स्वरूपात तुम्हाला प्राप्त होईल हि pdf कॉपी पासवर्ड ने सुरक्षित असेल. पासवर्ड हा 8 अंकाचा असतो. पासवर्ड मध्ये तुमच्या नावाचे सुरवातीचे 4 अक्षर आणि जन्म वर्ष असते. समजा व्यक्तीचे नाव विजय VIJAY आहे व जन्मवर्षे 1996 आहे तर पासवर्ड हा VIJA1996 असा असेल. मास्क आधार हे ओळखीच्या पुराव्यासाठी वापरले जाऊ शकते पण सरकारी कामासाठी ह्याचा उपयोग केला जात नाही.

English Summary: know about mask adhaar card and his benifit Published on: 30 October 2021, 03:16 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters