ग्राहकांच्या वस्तू व सेवांच्या बाबतीत असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 लागू करण्यात आला.हा कायदा वस्तू प्रो सेवांमध्येकाही दोष किंवा कमतरता असेल तर ग्राहक या कायद्यान्वये तक्रार दाखल करू शकतात.म्हणजे एकंदरीत याकायद्याद्वारे ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यात येते.
बाजार पेठेमधून ग्राहक म्हणून एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा आपल्या पैशाचे मूल्य गुणवत्ता, प्रमाण,योग्य किंमत आणि वापरण्याच्या पद्धती विषयी माहिती इत्यादी वरून ठरवतो. अशा परिस्थितीत एखाद्या वेळेस ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. अशा झालेल्या फसवणुकीची तक्रार आपण या कायद्यान्वये करू शकतो.
ग्राहक संरक्षण कायद्याची सारांश रूपाने माहिती
- ग्राहक निवारण मंच:
1-ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात एक ग्राहक निवारण मंच आहे.त्याला ग्राहक न्यायालय देखील म्हणतात.येथे ग्राहक त्यांच्या तक्रारी सांगू शकतात.
- जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा मंचाच्या वर एक राज्य आयोग आहे. राज्य आयोगाच्या वर नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोग आहे.संबंधित कंपनीला लेखी तक्रारी ची माहिती दिली गेली असल्याचा पुरावा म्हणून घेतले जाते.संबंधित तक्रारी चे बिल,डिस्क्रिप्शन किंवा इतर संबंधित कागदपत्रांच्या प्रती पुराव्यात असाव्यात. तसेच संबंधित वस्तू किंवा सेवांच्या अंतिम मुदत असणे आवश्यक आहे.
- ग्राहक त्यांची तक्रार ग्राहक संघटनेमार्फत देखील करू शकतात.जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या फोरम मध्ये एक लाख रुपयांपेक्षा कमी असलेले नुकसान भरपाईचे दावे दाखल करावेत.
- राज्य आयोगाकडे एक लाखांहून अधिक ते 20 लाख रुपयांचा दावा दाखल करता येतो.
- जर तक्रार वीस लाख रुपयांहून अधिक असेल तर असे दावे थेट राष्ट्रीय आयोगाकडे द्यावे लागतात.
या कायद्यान्वये तक्रार ची पद्धत
- एखादी वस्तू उत्पादन खरेदी केले असेल तेव्हा एखादी सेवा घेतली असेल तर त्याची तक्रार दोन वर्षाच्या आत दाखल करावे लागते.
- तक्रारी लेखी स्वरुपात द्यावी लागते.पत्रे नोंदणीकृत पोस्ट, हस्त वितरित,ई-मेल किंवा फॅक्सद्वारे पाठवाव्यात. पोचपावती घ्यायला विसरू नये.
- तक्रारीमध्ये तक्रारदाराचे नाव आणि पत्ता व त्याची तक्रार द्यायचे आहे त्या व्यक्तीच्या घटकाचा उल्लेख करावातसेच संबंधित कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
- संबंधित ग्राहकाने त्याला असलेल्या समस्येचे तपशील व त्याचे निराकरणकरण्यासाठी कंपनीकडे मागणी नमूद केली पाहिजे.उत्पादनामध्ये असलेला दोष दूर करणे, परतावा देणे किंवा घेतलेल्या खर्चाची भरपाई आणि शारीरिक किंवा मानसिकछळअसू शकतो.
- दावे दाखल करताना ते योग्य असले पाहिजेत.प्रकरणाशी संबंधित सर्व बिले, पावत्या आणि पत्र व्यवहाराचा पुरावा जतन करावा व्हॉइस मेल किंवा टेलिफोनवापरणेटाळावे. तक्रार कोणत्याही भारतीय भाषेत असू शकते परंतु इंग्रजी वापरणे चांगले.
- यामध्ये वकील घेण्याचीसक्तीनाही.मुख्य खर्चामध्ये पत्रव्यवहार आणि सुनावणीसाठी ग्राहक मंचाकडे प्रवास करणे समाविष्ट आहे.पाठवलेले आणि प्राप्त झालेले सगळे मेल्स आणि संबंधित कागदपत्रांची नोंद ठेवावी.
Share your comments