देशातील अनेक भागात शेतकऱी सावकार किंवा अन्य मार्गाने चढ्या दराने कर्ज देतो. या सावकाराच्या जाचातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी आता सरकारने पाऊल उचलले आहे. आपल्या देशातील शेतकऱ्याला आर्थिक चणचण भासू नये यासाठी केंद्र सरकारने क्रेडिट कार्डची योजना तयार केली आहे. या कार्डच्या माध्यमातून शेतकरी कर्ज घेऊ शकतात. राज्य सरकारने तर परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज हे फेडणार असल्याचे म्हटले आहे.
किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांचे कर्ज ४ टक्के दराने देण्यात येईल, अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली होती. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ४ टक्के दराने कर्ज मिळेल. शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज परत केले तर व्याज ३ टक्क्यांपर्यंत माफ केले जाईल. कर्जफेडीस जर उशिर झाला तर बँक ७ टक्के दर आकारेल. शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज परत केले तर कर्ज मर्यादा ३ लाखांपर्यंत वाढेल. दरम्यान जर तुम्ही १.६० हजार रुपयांचे कर्ज घेत असाल तर तुम्हाला तारण देण्याची गरज नाही.
या कार्डमुळे होतात हे फायदे : पैशाच्या वाटपाच्या पद्धती सोपे होतात. प्रत्येक पिकाच्या कर्जासाठी अर्ज करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांसाठी व्याजचा भार कमी होतो, शिवाय कर्ज मिळण्याची हमी.
शेतकऱ्यांच्या निवडीप्रमाणे, उर्वरके खरेजी करण्यास मदत होते. डीलर्सकडून खरेदीवर सूट मिळते. कर्ज घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, 3 फोटो लागतील. जर तुम्हाला 1 लाखापर्यंतचं कर्ज हवं तर गॅरेंटरची गरज नाही. पण, 1 लाखापुढील कर्जासाठी तुम्हाला गॅरेंटर लागेल. एक गोष्ट लक्ष ठेवा प्रत्येक बँकेची कर्ज मर्यादा वेगळी असते. या किसान क्रेडीट कार्डद्वारे तुम्ही पेसै देखील काढू शकता.
किसान क्रेडिट कार्ड कसे मिळवावे :
आपल्या नजीकच्या पब्लिक सेक्टर बँकेस भेट द्या आणि तपशील मिळवा. पात्र असलेल्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड आणि एक पासबुक मिळेल. त्यामध्ये नाव, पत्ता, जमिनीच्या मालकीचे (स्वामित्वाचे) विवरण, कर्ज घेण्याची सीमा, कायदेशीर मान्यता काळ, धारकाचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो ज्याचा उपयोग ओळख पत्र आणि नेहमीच्या व्यवहाराची नोंद करण्याची सोय असे दोन्ही हेतू साध्य करण्यासाठी करण्यात येईल.
या बँकांकडून मिळेल किसान कार्ड :
अलाहाबाद बँक – किसान क्रेडिट कार्ड (केसीसी)
आन्ध्र बँक – एबी किसान ग्रीन कार्ड
बँक ऑफ बडोदा – बीकेसीसी (बीकेसीसी)
बँक ऑफ इंडिया – किसान समाधान कार्ड
कॅनरा बँक – केसीसी
कॉरपोरेशन बँक – केसीसी
देना बँक – किसान गोल्ड क्रेडिट कार्ड
ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स – ओरिएन्टल ग्रीन कार्ड (ओजीसी)
पंजाब नॅशनल बँक – पीएनबी कृषि कार्ड
स्टेट बँक ऑफ हैदराबाद – केसीसी
स्टेट बँक ऑफ इंडिया - केसीसी
सिंडिकेट बँक – एसकेसीसी
विजया बँक – विजया किसान कार्ड
आयसीआयसीआय बँक, याशिवाय जवळच्या बँकेशी तुम्ही संपर्क साधल्यास तुम्हाला अधिक माहिती मिळेल.
आयसीआयसीआय बँकेचे किसान क्रेडिट कार्डसाठी असलेली पात्रता :
व्यक्तिगत किंवा सात बाऱ्यावर दोन जणांचे नाव असेल तरी आपण या कार्डसाठी अर्ज करू शकता.
जर तुम्ही बटाईसाठी( कसावरती ) शेत जमीन घेतली असेल तरीपण तुम्ही हे कार्ड घेण्यास पात्र असाल.
शेत जमीन बागायती किंवा त्या जमीनीतून उत्पन्न देणारे असावी.
या कार्डसाठी १८ ते ६० वर्षापर्यंतचे नागरिक अर्ज करु शकता.
क्रेडिट कार्डच्या कर्जासाठी लागणारी कागदपत्रे :
क्रेडिट कार्ड कर्जाचा अर्ज आपल्या स्वाक्षरीसह , आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, आदी. अर्जदाराचा राहण्याचा पत्ता, सातबारा उतारा किंवा शेत जमीन कसण्यासाठी घेतली असल्यास त्याचे प्रतिज्ञापत्र, पासपोर्ट साईज फोटो, कर्जासाठी तुम्ही थेट बँकेत जाऊ शकता. बँकेतील अधिकाऱ्यांकडून तुम्ही माहिती मिळवू शकता. त्याच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला ते कागदपत्र सांगतील. ती कागदपत्रे आपण जमा करु दिल्यास बँक आपल्याला कर्जाची पुर्तता करेल. स्टेट बँकेतून जर तुम्ही कार्ड घेत असाल तर तुम्ही ऑनलाईनही यासाठी अर्ज करु शकता. https://sbi.co.in/ या संकेतस्थळावर गेल्यास आपल्याला अर्ज मिळेल.
Share your comments