1. इतर बातम्या

Kisan Credit Card : कर्जाचा अर्ज करताना आवश्यक आहे क्रेडिट हिस्ट्री

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना २ हजार रुपयांचा सहावा हप्ता वितरित करण्यात येत आहे. या योजनेतेर्गंत वर्षाला ६ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा लाभ घेतल्यास लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जाते. या कार्डाच्या माध्यामातून शेतकरी फक्त ४ टक्के इतक्या व्याजदराने कर्ज घेऊ शकतो.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना २ हजार रुपयांचा सहावा हप्ता वितरित करण्यात येत आहे. या योजनेतेर्गंत  वर्षाला ६ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.  या योजनेचा लाभ घेतल्यास लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जाते. या कार्डाच्या माध्यामातून शेतकरी फक्त ४ टक्के इतक्या व्याजदराने कर्ज घेऊ शकतो.  शेतकरी याच्या माध्यमातून आपली आर्थिक नड पुर्ण करु शकतात.  किसान क्रेडिट कार्ड आपण बँकेत, एनबीपीएफसी, कॉमन सर्विसमधून मिळवू शकतात. 

दरम्यान सरकारने पीएम किसान योजनेच्या हप्त्यापासून ते किसान क्रेडिट कार्डवर अटी लावल्या आहेत. जे शेतकरी या अटी पुर्ण करतील तेच याचा लाभ घेऊ शकतील. किसान क्रेडिट कार्डच्या मदतीने कर्ज घेण्यासाठी काही अटी आहेत. आपण बऱ्याच वेळा तक्रार करतो की, कार्ड मिळाले पण बँका त्या कार्डवर कर्ज देत नाहीत अशी तक्रार आपण करत असतो. परंतु त्यामागे एक कारण आहे, ते म्हणजे कर्जासाठी अर्ज करताना आपल्याला कार्डची क्रेडिट हिस्ट्री दाखवावी लागेल. म्हणजे आपल्याकडे कोणते कर्ज थकीत नाहीत ना याची शाश्वती यातून बँक कर्मचारी करत असतात.  दरम्यान बँक १.६० लाख रुपयाच्या कर्जासाठी कोणतेही तारण मागणार नाही. सर्व गगोष्टींची पुर्तता असल्याची खात्री झाल्यानंतर बँक कर्मचारी किसान क्रेडिट कार्डधारकांना कर्ज देतील. पण जर कोणत्याप्रकारची त्रुटी असेल तर कर्जाचा अर्ज मंजूर होणार नाही.

क्रेडिट कार्डच्या कर्जासाठी लागणारी कागदपत्रे :

  • क्रेडिट कार्ड कर्जाचा अर्ज आपल्या स्वाक्षरीसह
  • आधारकार्ड
  • पॅनकार्ड
  • मतदान कार्ड, आदी.
  • अर्जदाराचा राहण्याचा पत्ता
  • सातबारा उतारा किंवा शेत जमीन कसण्यासाठी घेतली असल्यास त्याचे प्रतिज्ञापत्र
  • पासपोर्ट साईज फोटो

जर आपण पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर आपल्याला  अधिक कागदपत्रे देण्याची गरज नाही. पीएम किसान योजनेसाठी देण्यात आलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपण किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करु शकतात. जर आपल्याला या कार्डच्या माध्यमातून कर्ज हवे असेल तर आपण  थेट बँकेत जाऊ शकता. बँकेतील अधिकाऱ्यांकडून तुम्ही माहिती मिळवू शकता. त्याच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला ते कागदपत्र सांगतील. ती कागदपत्रे आपण जमा करु दिल्यास बँक आपल्याला कर्जाची पुर्तता करेल.  स्टेट बँकेतून जर तुम्ही कार्ड घेत असाल तर तुम्ही ऑनलाईनही यासाठी अर्ज करु शकता. https://sbi.co.in/ या संकेतस्थळावर गेल्यास आपल्याला अर्ज मिळेल.

दरम्यान पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वाटण्याच्या सुचना केंद्राने दिल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांला तीन लाखपर्यंतचे कर्ज मिळू शकते. महाराष्ट्रात २० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो. मात्र केसीसी किसान क्रेडिट कार्ट वाटण्याकडे बँकांना दुर्लक्ष करत असल्याती तक्रारी येत आहेत. पीएम किसान योजनेत समावेश झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने किसान क्रेडिट कार्डचे वाटप करुन खरिपासाठी प्राधान्याने कर्जपुरवठा करावा अशा सुचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. साधरण ६ कोटी शेतकऱ्य़ांकडेच केसीसी कार्ड आहे.

 

English Summary: Kisan Credit Card : Credit history is required when applying for a loan Published on: 04 August 2020, 01:04 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters