या लेखाच्या माध्यमातून आपण एक शेतकऱ्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या योजनांबद्दल माहिती घेणार आहे.या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर काही वर्षानंतर तुमचा पैसा दुप्पट होऊ शकतो. किसान विकास पत्र ही योजना भारत सरकारची आहे. ग्रामीण भागात राहणारी शेतकरी या योजनेच्या माध्यमातून सहजतेने स्वतःचे खाते उघडू शकता.
किसान विकास पत्र योजनेमध्ये खाते उघडण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. बँक आणि पोस्ट ऑफिस बऱ्याच प्रकारच्या छोट्या छोट्या बचत योजना चालवत आहेत. किसान विकास पत्र या योजनेसाठी खात उघडण्यासाठी तुम्हाला तुमच्या नजीकच्या पोस्ट ऑफिस च्या शाखेत जावे लागेल. यामध्ये तुम्ही जे पैसे गुंतवणूक कराल ते पैसे 124 महिन्यांमध्ये दुप्पट होतील.जाणून घेऊ या योजने बद्दल सविस्तर.
किसान विकास पत्र योजना
या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला वार्षिक 6.9टक्के व्याजदराने रिटन मिळतो. या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, या युद्धात तुम्ही कमी पैशांमध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकता.
कमीत कमी एक हजार रुपये जमा करून तुम्ही तुमचे खाते या योजनेत उघडू शकता.भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये भेट दिल्यानंतर या बचत योजना तुम्ही तुमची खाते ओपन करू शकता. जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर मी तुमच्या नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन एक अकाउंट ओपनिंग फॉर्म भरून खाते उघडू शकता.त्यानंतर तुमच्या आवश्यक कागदपत्रे न व्हेरिफाय करुन तुमचे खाते ओपन केले जाते.
तसेच ऑनलाईन फॉर्म डाऊनलोड करून सुद्धा किसान विकास पत्र या योजनेमध्ये खाते उघडता येते.
जर तुमचे वय दहा वर्षापेक्षा जास्त असेल, अगदी सहजतेने तुम्ही या योजनेमध्ये खाते उघडू शकता. या योजनेमध्ये तुम्ही तुम्हाला हवी तितकी रक्कम गुंतवू शकता. भारतातील बरेचसे लोक किसान विकास पत्र या योजनेमध्ये पैसा आहे गुंतवणूक करीत आहेत.
टीप- कुठल्याही योजनेत गुंतवणूक करणे अगोदर गुंतवणूक तज्ञांचा सल्ला घ्यावा.
Share your comments