1. इतर बातम्या

लई भारी! फक्त 50 हजार रुपये भरा आणि घरी घेऊन जा Maruti Alto CNG; जाणून घ्या या ऑफर विषयी सविस्तर

देशात अलीकडे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, इलेक्ट्रिक वाहनांसमवेतच सीएनजी गाड्यांची देखील खपत अधिक होत असल्याची माहिती समोर येत आहे. देशात सर्वत्र पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आकाशाला गवसणी घालत असल्याने हा बदल नमूद करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
image courtesy- times now

image courtesy- times now

देशात अलीकडे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, इलेक्ट्रिक वाहनांसमवेतच सीएनजी गाड्यांची देखील खपत अधिक होत असल्याची माहिती समोर येत आहे. देशात सर्वत्र पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आकाशाला गवसणी घालत असल्याने हा बदल नमूद करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.

आधीच पेट्रोल-डिझेलच्या किमती मध्यमवर्गीय लोकांच्या आवाक्याबाहेरच्या असतानाचं रशिया आणि युक्रेनमध्ये पेटलेल्या युद्धामुळे यात अजून मोठी वाढ होणार असल्याची शक्यता तज्ञाकडून वर्तविण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढच होत आहे म्हणूनच की काय आता लोक सीएनजी गाड्या खरेदी करण्याकडे वळले आहेत. भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक दिग्गज कंपन्यांनी आता आपल्या गाड्या सीएनजी वैरिएंटमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.

मारुती सुझुकी ही देखील देशातील अग्रगण्य मोटोकॉर्प कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीदेखील मागणी लक्षात घेता सीएनजी गाड्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करत आहे. या कंपनीची मारुती सुझुकी अल्टो गाडी कंपनीने सीएनजी वैरिएंट मध्ये उपलब्ध करून दिली आहे. मध्यमवर्गीय लोक या गाडीला विशेष पसंत करतात, या गाडीला आपल्या देशात फॅमिली कार म्हणून संबोधले जाते. या गाडीची किंमत मध्यमवर्गीय लोकांच्या खिशाला झेपणारी असल्याने तसेच गाडीचे मायलेज आणि लुक भन्नाट असल्याने या गाडीची विशेष मागणी असते.

मारुती सुझुकी अल्टो 800 LXI S-CNG या मारुती सुझुकीच्या गाडीची एक्स शोरूम किंमत 4.89 लाख रुपये एवढी आहे. मित्रांनो जर आपल्याकडे एवढी मोठी रक्कम उपलब्ध नसेल तर आपण पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट भरून ही कार खरेदी करू शकता. ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, एवढे कमीत कमी डाऊन पेमेंट भरल्यानंतर आठ रुपये टक्के व्याजदराने पाच वर्षासाठी 9895 रुपये मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

हेही वाचा:-

काय सांगता! फक्त 8 हजार रुपये डाउनपेमेंट भरून आता मिळणार हिरो स्प्लेंडर प्लस; जाणून घ्या या विषयी सविस्तर

आनंदाची बातमी! 'या' ठिकाणी बजाज प्लॅटिना मिळतेय फक्त 15 ते 25 हजाराच्या दरम्यान; जाणून घ्या ही आकर्षक डील

Cheapest Scooter In India: भारतातील सर्वात स्वस्त दमदार मायलेजच्या इलेक्ट्रिक स्कूटर; किंमत फक्त 34 हजार 899 पासून सुरु

English Summary: just pay 50 thousand and take maruti alto at home learn more about it Published on: 12 March 2022, 03:40 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters