कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊमुळे अनेकांना आपले काम गमवावे लागले. अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. सामन्य जनतेला अधिक आर्थिक फटका बसून नये यासाठी केंद्र सरकार पंतप्रधान गरीब कल्याण पॅकजेच्या अंतर्गत प्रधानमंत्री जनधन योजनेतील महिला खातेधारकांना ५०० रुपयांची मदत केली. मार्च महिन्यापासून महिलांच्या खात्यात पैसे टाकले जात आहेत. या महिन्यात म्हणजे जून महिन्यातील राशी महिला खातेधारकांच्या खात्यात आली आहे.
भारतीय बँक संघाने ट्विट करुन याची माहिती दिली आहे. आपले पैसे सुरक्षित आहेत, बँकांमध्ये गर्दी उसळू नये यासाठी वेळेपत्रकानुसार शाखा, सीएसपी, बँक मित्रांकडून पैसे काढावेत असे या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे. सरकारकडून महिला खातेधारकांच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता टाकला आहे. तर जाणून घ्या कधी मिळणार आपल्याला आपला पैसा. बँकेत पैसे काढण्यासाठी जात असाल तर आपल्या खाते क्रमांकाचा शेवटचा अंक लक्षात ठेवा.
दिनांक - जनधन खाते क्रमांकाचा शेवटचा अंक
५ जून - ०-१
६ जून - २ आणि ३
८ जून - ४ आणि ५
९ जून - ६ आणि ७
१० जून - ८ आणि ९
पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजचा भाग आहे ५०० रुपये
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मार्च महिन्याच्या शेवटी पंतप्रधान जनधन योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महिला खातेधारकांना तीन महिन्यापर्यंत दर महा ५०० रुपयांची राशी दिली जाणार असल्याची घोषणा केली होती. ही राशी १.७ लाख कोटी रुपये प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजचाच भाग आहे. यासह सरकार गरीब लोकांना मोफत अन्नधान्यही देत आहे.
Share your comments