1. इतर बातम्या

काय सांगता! केवळ 6 हजार 500 रुपयात लाँच झाला 'या' कंपनीचा स्मार्टफोन; फिचर्स आहेत खुप भन्नाट

iTel ही एक चीनी स्मार्टफोन (smartphone) बनवणारी कंपनी आहे, ही कंपनी बजेट स्मार्टफोन बनवण्यासाठी ओळखली जाते. कंपनीने नुकताच एक लो बजेट स्मार्टफोन बाजारात आणला (Low Budget Smartphone) आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
itel launch new smartphone

itel launch new smartphone

iTel ही एक चीनी स्मार्टफोन (smartphone) बनवणारी कंपनी आहे, ही कंपनी बजेट स्मार्टफोन बनवण्यासाठी ओळखली जाते. कंपनीने नुकताच एक लो बजेट स्मार्टफोन बाजारात आणला (Low Budget Smartphone) आहे. 

या बजेट स्मार्टफोनमध्ये असलेले फिचर्स फुल टू पैसा वसूल असल्याने हा फोन लवकरच सुपरहिट होणार असे सांगितले जातं आहे. iTel ने A49 हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे या स्मार्टफोनची किंमत कंपनीने 6499 एवढी ठेवली आहे. आपल्या किंमतीमुळे हा स्मार्टफोन अल्प कालावधीत ग्राहकांच्या पसंतीस खरा उतरू शकतो.

हेही वाचा:-अरे व्वा! सॅमसंगचा 108 MP रिअर कॅमेरा आणि 32 MP फ्रंट कॅमेरा असलेला स्मार्टफोन लवकरच बाजारात दाखल होणार

स्मार्टफोनचे फिचर्स

या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.6 इंच साईज असलेला एचडी आयपीएस डिस्प्ले दिला आहे. हा एक अँड्रॉइड स्मार्टफोन असून अँड्रॉइड 11 गो यावर रन होतो. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने क्वाड कोर प्रोसेसर दिले आहे.

या स्मार्टफोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल मेमोरी देण्यात आली आहे. स्मार्ट फोन मध्ये मेमरी स्लॉट दिला असून 128 जीबी पर्यंत मेमोरी एक्सटेंड करता येऊ शकते. त्यामुळे या स्मार्टफोनमध्ये पुरेशी स्पेस आहे.

हेही वाचा:-लई भारी! Xiaomi ने लाँच केला 50 मेगापिक्सल कॅमेराचा Redmi 10C, एक भन्नाट फिचर्सवाला स्मार्टफोन; किंमत ऐकून तुम्हीही म्हणाल वाह क्या बात है!

या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, 5 MP चा रियर कॅमेरा आहे जो की एक AI कॅमेरा आहे. सेल्फी साठी आणि व्हिडीओ कॉलिंग साठी कंपनीने 5 MP चा फ्रंट कॅमेरा देखील उपलब्ध करून दिला आहे. स्मार्टफोनमध्ये 4000 mAH ची बॅटरी आहे त्यामुळे हा चांगला बॅटरी बॅकअप देणारा फोन ठरू शकतो.

फोनमधे सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर तसेच फेस अनलॉक सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन क्रिस्टल पर्पल, डोम ब्लू आणि स्काय स्यान या तीन कलर व्हेरीयंट मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. एकंदरीत लो बजेट मध्ये हा एक चांगला स्मार्टफोन ठरू शकतो.

हेही वाचा:-लई भारी! Redmi चा 108 MP कॅमेरा आणि 8 Gb रॅम असलेला हँडसेट झाला लाँच; किंमत ऐकून तुम्हीही म्हणाल, वाह क्या बात है!

English Summary: itel launch low budget smartphone Published on: 17 March 2022, 02:26 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters