भारतात आधार कार्ड एक महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. आधार कार्डविना भारतात कुठलेच काम करणे शक्य नाही. आता भारत सरकारने पाच वर्षाच्या आतील मुलांना देखील आधार कार्ड अनिवार्य केले आहे. अलीकडे शाळा महाविद्यालयात ऍडमिशन घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे त्यामुळे लहान मुलांची आधार कार्ड (Aadhar card for children) बनवणे देखील आता गरजेचे बनले आहे. देशात आधार कार्डचा वापर प्रत्येक सरकारी तसेच गैरसरकारी कार्यात केला जातो त्यामुळे आधार कार्ड भारतात एक महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे.
आधार कार्ड बँकेत खाते खोलण्यासाठी, शाळा-महाविद्यालये ऍडमिशन घेण्यासाठी, पैसे पाठवण्यासाठी, केवायसी करण्यासाठी, पॅन कार्ड काढण्यासाठी, रेशन कार्ड काढण्यासाठी, रेशन घेण्यासाठी, एवढेच नव्हे तर लस घेण्यासाठी देखील आधार कार्ड अनिवार्य केले गेले आहे. त्यामुळे आधार कार्ड ची उपयोगिता ध्यानात घेऊन आता आपल्या पाच वर्षाच्या आतील मुलांची देखील आधार कार्ड बनविणे अनिवार्य झाले आहे. जर आपले पाच वर्षाच्या आतील मुलं असेल तर त्याचे देखील आधार कार्ड काढले जाऊ शकते मात्र त्यासाठी बायोमेट्रिक घेतले जाणार नाही. जेव्हा तुमच्या मुलाचे वय पाच वर्षाच्या पुढे होईल तेव्हा त्याचे बायोमेट्रिक केली जाईल. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया पाच वर्षाच्या आतील मुलांचे आधार कार्ड काढण्याची प्रोसेस.
आधार केंद्राला भेट द्या
मित्रांनो जर आपणांस आपल्या पाल्याचे आधार कार्ड काढायचे असेल तर, आपल्या जवळच्या आधार केंद्राला भेट द्या. आधार केंद्राला भेट दिल्यानंतर आपणास आधार काढण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. फॉर्म सोबतच ज्या मुलाचे आधार काढायचे आहे त्यांच जन्म प्रमाणपत्र झेरॉक्स, दोन पासपोर्ट साईज फोटो, तसेच ज्याच्या आधार काढायचे आहे त्याच्या आई-वडिलांचे आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे आधार केंद्रात जमा करावे लागतील.
एवढी प्रोसेस पूर्ण केल्यानंतर आधार कार्ड हे सर्व पोस्ट द्वारे अर्जदाराच्या घरी प्राप्त होते. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की आधार कार्ड तयार होण्यासाठी 90 दिवसाचा कालावधी लागतो. जेव्हा आपण आधार कार्ड साठीअर्ज करता तेव्हा आपणास आधार केंद्रावर एक एनरोलमेंट पावती दिली जाते, त्यावर आपला एनरोलमेंट आयडी असतो याद्वारे आपण आधार ची स्थिती चेक करू शकता.
Share your comments