नुकत्याच काही दिवसांपूर्वी अँपलने आपला सर्वात स्वस्त आयफोन लॉन्च केला होता. Apple ने लाँच केलेला iPhone SE 2022 हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त आयफोन आहे, एवढेच नाही तर हा लॉन्च केलेला आयफोन 5जी नेटवर्कला सपोर्ट करतो. परंतु असे असले तरी, याच्यापेक्षा अधिक फीचर्स आयफोन 13 मिनी या आयफोन मध्ये असल्याचा दावा केला जातो.
मात्र, याची किंमतही खूप अधिक आहे, परंतु आज आम्ही iPhone 13 Mini या आयफोनवर सुरू असलेल्या एका भन्नाट ऑफर विषयी माहिती देणार आहोत. या ऑफरचा उपयोग करून आपण हा 70 हजाराचा आयफोन केवळ 45 हजारात खरेदी करू शकता. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या भन्नाट ऑफर विषयी सविस्तर माहिती.
काय आहे ही ऑफर
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, iPhone 13 Mini 128 Gb हा आयफोन 69,900 रुपये किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. असे असले तरी, आपण आपल्या अधिकृत वेबसाईटवर अर्थात इंडियन एप्पल स्टोर या वेबसाईटवर या हँडसेटवर 6 हजार रुपयाचा डिस्काउंट प्राप्त करू शकता.
एवढेच नाही जर आपण हा आयफोन खरेदी करण्यासाठी एसबीआय कोटक किंवा आयसीआयसीआय या बँकेच्या क्रेडिट कार्डचा उपयोग केला तर आपणास सहा हजार रुपयाचा कॅशबॅक मिळू शकतो. म्हणजे आपण या दोन ऑफरचा फायदा घेऊन तब्बल 12 हजार रुपयांची सेविंग करू शकता. मित्रांनो जर आपणास या आयफोन वरती अजुन बचत करायची असेल तर आपण आपला जुना हँडसेट एक्सचेंज करून तब्बल 12 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर प्राप्त करू शकता.
म्हणजेच जवळपास 70 हजार रुपयांचा आयफोन आपणास मात्र 45 हजार 900 रुपयात प्राप्त होऊ शकतो.
हेही वाचा:-
Good News: फ्लिपकार्टवर केवळ सहा हजार रुपयात भेटतंय गोदरेजचं फ्रिज; ऑफर संपण्याआधीच करा ऑर्डर
Share your comments