देशात अनेक लोक वेगवेगळ्या विमा कंपनीत गुंतवणूक करत असतात. देशात अनेक वेगवेगळ्या विमा कंपन्या अस्तित्वात आहेत या विमा कंपन्यांपैकी एलआयसी ही सर्वात मोठी विमा कंपनी असल्याचा तमगा मिरवत आहे. एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना आणत असते.
यावेळी भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी यांनी महिलांसाठी एक विशेष योजना आणली आहे. महिलांसाठी आणलेली ही विशेष योजना खूपच लोकप्रिय देखील बनली आहे. एलआयसी ने आणलेल्या या नवीन योजनेचे आधारशिला असे नामकरण करण्यात आले आहे, या योजनेला आधार शिला नाव देण्याचे कारण असे की ही योजना फक्त त्याच महिलांसाठी आणण्यात आली आहे ज्या महिलांकडे आधार कार्ड उपलब्ध आहे. या योजनेत केवळ आधार कार्ड धारक महिलाच गुंतवणूक करू शकतात, त्यामुळे या योजनेला आधारशीला नाव देण्यात आल्याचे सांगितले जाते.
आधारशिला ही एलआयसीची महत्त्वाकांक्षी योजना 1 फेब्रुवारी 2020 या दिवशी सुरू करण्यात आली आहे. या पॉलिसीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही पॉलिसी गुंतवणूक सोबतच पॉलिसीधारकाला लाइफ कवर देखील प्रदान करते. आधारशिला या पॉलिसीत एखाद्या महिलेने दररोज 29 रुपये अर्थात महिन्याकाठी 870 रुपये गुंतवले असता या योजनेद्वारे मॅच्युरिटी वर चार लाख रुपये दिले जातात. या योजनेचे अजून एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे या पॉलिसी च्या अगेन्स्ट कर्ज देखील घेता येते.
आधारशिला पॉलिसीच्या महत्त्वपूर्ण बाबी
- एल आय सी ची महत्त्वाकांक्षी योजना आधारशिला पॉलिसी भारतातील 8 ते 55 वयोगटातील कोणतीही महिला काढू शकते.
- आधार शिला पोलिसी दहा वर्षासाठी काढले जाते असे असले तरी ह्या पॉलिसीची जास्तीत जास्त मुदत वीस वर्ष ठेवण्यात आली आहे.
- तसेच पॉलिसीच्या मॅच्युरिटी च्या वेळी पॉलिसीधारक महिलेचे वय 70 वर्षेपेक्षा जास्त नसावे असे देखील योजनेत सांगितलं आहे.
- आधारशिला पॉलिसी अंतर्गत विम्याची कमीत कमी रक्कम 75 हजार रुपये असून जास्तीत जास्त रक्कम 30 लाखापर्यंत असू शकते.
- आधार शिला पॉलिसी अंतर्गत पॉलिसीधारक महिलेला अपघातीचा विमा देखील प्रदान केला जातो.
- जर एखाद्या आधार कार्ड धारक महिलेचे वय वीस वर्षे असेल आणि तिला ही पोलिसी 20 वर्षाची काढायची असेल आणि पॉलिसी अंतर्गत तिने तीन लाखाचा विमा उतरवला असेल, तर अशा महिलेला या पॉलिसीसाठी 10649 रुपये वार्षिक प्रीमियम भरावा लागणार आहे. म्हणजे अवघे 29 रुपय दररोजचा प्रीमियम या पॉलिसीसाठी भरावा लागणार आहे.
- पॉलिसी मॅच्युरिटीवर चार लाख रुपये मिळतात यामध्ये दोन लाख रुपये पॉलिसीची रक्कम असते आणि दोन लाख रुपये एलआयसी कडून बोनस दिला जातो.
- या पॉलिसीसाठी आपण महिन्यात, तीन महिन्यात, सहा महिन्यात तसेच बारा महिन्यात देखील प्रीमियम भरू शकता.असे असले तरी काही कारणास्तव तुम्ही वेळेवर प्रीमियम भरू शकला नाही तर तुम्हाला एक महिन्याचा अतिरिक्त कालावधी देखील या पॉलिसी अंतर्गत देण्यात येतो.
- मात्र आपण जर एक महिन्यात प्रीमियम भरत असाल तर आपणास फक्त पंधरा दिवसाचा अतिरिक्त कालावधी पॉलिसी अंतर्गत देण्यात येईल.
- पॉलिसी काढल्यापासून पाच वर्षाच्या आत पॉलिसीधारक महिलेचा मृत्यू झाल्यास, विम्याच्या रक्कमेइतकी रक्कम एलआयसी संबंधित पॉलिसीधारकाला देते. परंतु जर पाच वर्षानंतर पॉलिसीधारकाला चा मृत्यू झाला तरत्या संबंधित पॉलिसीधारकाला विम्याची रक्कम आणि लॉयल्टी बोनस देखील एलआयसी द्वारे प्रदान केला जातो.
- पॉलिसीची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर आपणास एकाच वेळी मॅच्युरिटी दिले जाईल किंवा आपण ती इंस्टॉलमेंट मध्ये देखील प्राप्त करू शकता.
- आपण ही पॉलिसी दोन वर्ष सलग चालू ठेवली असता अर्थात प्रीमियम भरला असता आपण त्यानंतर ती पॉलिसी कधीही एलआयसीला सरेंडर करू शकता.
Share your comments