भारत शेतीप्रधान देश आहे. काळाच्या ओघात भारतीय शेतीत आता मोठा बदल झाला आहे. आता शेतीच्या कामात ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असल्याचे बघायला मिळत आहे. ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतकऱ्यांची शेतीची सर्व कामे म्हणजेच पूर्व मशागतीपासून ते काढणीपर्यंत सर्व शेतीची उपयोगी कामे सुलभ झाली आहेत.
शेतीत ट्रॅक्टरचा अधिक उपयोग होत असल्याने शेतकऱ्यांचा वेळ वाचत आहे यामुळे आता बहुतांश सधन शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर बघायला मिळत आहेत. ट्रॅक्टरचा आता मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे विशेषता शेती त्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे, असे असले तरी आपल्यामध्ये असे बरेच लोक आहेत ज्यांना ट्रॅक्टरमध्ये आढळणाऱ्या काही गोष्टींबद्दल विशेष माहिती नाही, जसे की ट्रॅक्टरची मागील चाके मोठी का असतात आणि पुढची चाके लहान का असतात? कदाचित तुम्हाला देखील या गोष्टीची कुठलीही कल्पना नसेल. असे असेल तर आज आपण याबद्दल संपूर्ण माहिती तपशीलवार जाणुन घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी.
ट्रॅक्टरचे मागील चाक का असते मोठे?
मित्रांनो जसे की आपणास ठाऊक आहे कोणतीही जड वस्तू खेचण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो. याच्या मदतीने आपण सर्वात जड वजनाच्या वास्तूलाही सहज खेचू शकतो, त्यामुळे चाकांचा रोल मुख्य आहे. या व्यतिरिक्त ट्रॅक्टरने नांगरणी सारखी जड कामे देखील केली जातात यामुळे ट्रॅक्टरच्या चाकांवरच ट्रॅक्टरचा सर्व खेळ हा सुरू असतो. चाकाचा आकार जितका मोठा तितकच ट्रॅक्टरला अधिक बळ मिळत असते. ट्रॅक्टरला असलेल्या मोठ्या चाकांमुळे कोणतीही गोष्ट सहज खेचली जात असते. याशिवाय ट्रॅक्टरची मोठी चाके असल्याने जमिनीवर चिखल असल्यास किंवा खडकाळ जमिनीतून ते सहज बाहेर येतं असते. यासोबतच मोठ्या चाकांमध्ये ग्रिपची सुविधा तयार करण्यात आलेली असते, ज्यामुळे चिखल असलेल्या जमीनीतून ट्रॅक्टर सहज बाहेर पडत असते. यामुळेच ट्रॅक्टर खडबडीत जमिनीवरही सहज फिरत असते. यामुळे ट्रॅक्टरची मागील चाके मोठी असतात.
ट्रॅक्टरचे पुढील चाके का असतात छोटी
दुसरीकडे, जर आपण ट्रॅक्टरच्या लहान म्हणजेच पुढच्या चाकांबद्दल बोललो, तर पुढची चाके स्टीयरिंगला जोडलेली असतात, ज्यामुळे ट्रॅक्टर सहजपणे फिरण्यास मदत होते. चाके छोटी म्हणजेच वजन कमी आणि वजन कमी असल्याने ट्रॅक्टर सहज नियंत्रित करता येतो. याशिवाय ट्रॅक्टरची छोटी चाके शेतातील कोणत्याही खडबडीत आणि चिखलाने भरलेल्या जागी सहजपणे निघतात.
Share your comments