राज्यात निवडक फळपिकांसाठी हवामान आधारित प्रधानमंत्री फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. सदर योजना फळपिक निहाय अधिसूचित केलेल्या जिल्हयामधील, तालुक्यातील, महसूल मंडळात राबविण्यात येते. कार्यान्वित करणारी विमा कंपनी सदर योजना शासनाच्या निर्देशित हवामान केंद्र येथे नोंदल्या गेलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना ग्राह्य होणारी नुकसान भरपाई परस्पर देईल.
मार्च 2019 मध्ये काही ठिकाणी तापमानात खूप वाढ दिसून आली आणि येणार्या एप्रिल व मे 2019 मध्ये तापमान वाढण्याची शक्यता लक्षात घेता, यामुळे काही पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. या परिस्थितीत ठराविक फळपिक निहाय तापमान ठराविक मर्यादेच्या पुढे गेल्यास त्या त्या फळपिकासाठी निश्चित करण्यात आलेल्या हवामान धोके/ट्रिगर नुसार त्या फळपिकासाठी विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळू शकते.
मोसंबी, संत्रा, केळी, लिंबू व आंबा पिकांसाठी जादा तापमानाचे निश्चित करण्यात आलेले ट्रिगर व त्यानुसार देय होणारी नुकसान भरपाई रक्कम माहिती पुढीलप्रमाणे आहे.
अ. क्र. | फळपिक | पिकाचा जास्त तापमान हवामान धोक्यापासून निश्चित केलेला संरक्षण कालावधी | हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमान डिग्री सेल्सियस मध्ये) | विमा संरक्षित रक्कम रु. प्रती हेक्टर |
1 | मोसंबी | 1 मार्च 2019 ते 31 मार्च 2019 | दैनंदिन तापमान 39 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास | |
सलग 3 दिवस राहिल्यास | रु. 5,060/- | |||
सलग 4 दिवस राहिल्यास | रु. 10,200/- | |||
सलग 5 दिवस राहिल्यास | रु. 15,400/- | |||
सलग 6 दिवस राहिल्यास | रु. 20,570/- | |||
सलग 7 दिवस राहिल्यास | रु. 25,800/- | |||
2 | संत्रा | 1 मार्च 2019 ते 31 मार्च 2019 | सलग 3 दिवस 39.5 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास | रु. 19,250/- |
1 एप्रिल 2019 ते 31 मे 2019 | सलग 3 दिवस 45 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास | रु. 19,250/- | ||
3 | केळी | 1 मार्च 2019 ते 31 मार्च 2019 | सलग 3 दिवस 40.5 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास | रु. 13,200/- |
सलग 4 दिवस 40.5 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास | रु. 19,800/- | |||
सलग 5 दिवस 40.5 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास | रु. 33,000/- | |||
1 एप्रिल 2019 ते 31 मे 2019 | सलग 3 दिवस 44 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास | रु. 13,200/- | ||
सलग 4 दिवस 44 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास | रु. 19,800/- | |||
सलग 5 दिवस 44 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास | रु. 33,000/- | |||
4 | लिंबू | 15 जानेवारी 2019 ते 30 मार्च 2019 |
सलग 3 दिवस तापमान 39 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास |
रु. 22,000/- |
जिल्हानिहाय विमा योजना राबविणारी विमा कंपनी.
अ.क्र |
विमा कंपनीचे नाव |
समाविष्ट जिल्हे |
एकूण जिल्हे |
1 |
दि न्यू इंडिया इन्शुरंस कंपनी |
वाशिम, वर्धा, जालना, पुणे, रत्नागिरी, लातूर, अकोला. |
7 |
2 |
एग्रिकल्चर इन्शुरंस कंपनी ऑफ इंडिया लि. |
ठाणे, कोल्हापूर, परभणी, यवतमाळ, नाशिक, हिंगोली, रायगड, धुळे, नागपुर, जळगाव, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, उस्मानाबाद, नंदुरबार, बुलढाणा, औरंगाबाद, अहमदनगर, अमरावती, पालघर, सांगली, नांदेड, बीड. |
23 |
शेतकर्यांनी अधिक महितीसाठी संबंधित विमा कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधावा.
Share your comments