महावितरणाच्या घरगुती वर्गवारीतील ग्राहकांसाठी रूफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठीकेंद्र शासनाकडून 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणारआहे. या यंत्रणेच्या वापरामुळे मासिक घरगुती बिलात मोठी बचत होणार आहे.
तसेच नेट मीटरिंग च्या माध्यमातून महावितरण कडून वर्षातील शिल्लक वीजदेखील विकत घेतली जाणार आहे.
केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या रूफटॉप सौर योजना टप्पा 2 अंतर्गत महावितरण साठी 25 मे गावात असे उद्दिष्ट मंजूर झाले असून या योजनेच्या माध्यमातून घरगुती ग्राहकांना किमान एक किलो वेट क्षमतेची तर रूफटॉप सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी केंद्र शासनाकडून आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून घरगुती ग्राहकांना 1ते 3 किलो वॅट पर्यंत 40 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तीन किलो वॅट पेक्षा जास्त व दहा किलोवॅट पर्यंत 20 टक्के अनुदान मिळणार आहे.तसेच सामाजिक वापरासाठी 500 किलो वॅट पर्यंत, प्रत्येक घरासाठी दहा किलो वॅट मर्यादेत गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांसाठी20 टक्के अनुदान मिळणार आहे.
रूप टॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेसाठी पाच वर्षाचा खर्च करून प्रति किलो वेट एवढी रक्कम जाहीर
- एक किलोवॅट- 46 हजार 820
- एक ते दोन किलो वॅट – 42 हजार 470
- दोन ते तीन किलो वॅट- 41 हजार 380
- तीन ते दहा किलो वॅट- 40 हजार 290
- 10 ते 100 किलोवॅट साठी 37 हजार वीस रुपये प्रति किलो वॅट किंमत जाहीर करण्यात आली आहे.
Share your comments