1. इतर बातम्या

Inflation:आता हॉस्पिटलमध्ये ही महागाईचा शिरकाव,उपचार आणि औषधे घेणे करेल खिसा रिकामा

सामान्य जनतेचे जीवन जगणे मुश्कील करून टाकलेले आहे.अगदी स्वयंपाक घरात लागणाऱ्या बऱ्याच वस्तू असो की दैनंदिन आयुष्यातील बऱ्याच वस्तू यांनी महागाईचा कळस गाठला आहे. पेट्रोल व डिझेल, खाद्यतेल, स्वयंपाकाचा तसेच व्यावसायिक गॅस तर महाग झाले आहेत परंतु आता त्यासोबतच हॉस्पिटलमध्ये जाऊन आरोग्य सेवेचा लाभ घेणे हेदेखील आता महाग पडणार आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
inflation entered in medical field so taking treatment are expensive

inflation entered in medical field so taking treatment are expensive

सामान्य जनतेचे जीवन जगणे मुश्कील करून टाकलेले आहे.अगदी स्वयंपाक घरात लागणाऱ्या बऱ्याच वस्तू असो की दैनंदिन आयुष्यातील बऱ्याच वस्तू यांनी महागाईचा कळस गाठला आहे. पेट्रोल व डिझेल, खाद्यतेल, स्वयंपाकाचा तसेच व्यावसायिक गॅस तर महाग झाले आहेत परंतु आता त्यासोबतच हॉस्पिटलमध्ये जाऊन आरोग्य सेवेचा लाभ घेणे हेदेखील आता महाग पडणार आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर पडलेला तसेच चीनमधील लॉकडाऊन आणि काही सरकारची धोरणे यामुळे जे काही वैद्यकीय उपकरणे आणि लागणारे औषधे आयात केली जातात, त्यांच्या किमतींचा जर आपण विचार केला तर तो एका वर्षात 12 ते 55 टक्क्यांनी वाढले आहेत.

नक्की वाचा:Rule Change: ऑगस्टपासून बदलतील हे नियम, वाचा काय होईल तुमच्या खिशावर परिणाम

 काय आहेत यामागची कारणे?

 जर आपण रुपयाचे अवमूल्यन पाहिले तर ते या वर्षात सुमारे 7.5 टक्के झाले असून त्यामुळे वैद्यकीय उपकरणांचे आयात देखील खूपच महाग झाली आहे.

एवढेच काय तर औषधांचा जो काही मुख्य कच्चामाल असलेल्या एपीआय ची किंमत एकशे वीस टक्‍क्‍यांनी वाढल्या मुळे आता सर्वांमध्ये सरकारने पाच हजारांपेक्षा जास्त भाडे असलेल्या नॉन आयसीयू रुग्णालयाच्या खोल्यांवर पाच टक्के जीएसटी लागू केला आहे. त्यामुळे वैद्यकीय खर्चात झपाट्याने वाढ होऊ शकते.

नक्की वाचा:आजचा सोन्याचा भाव: आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या काय आहेत आज 10 ग्राम सोन्याचे भाव

जर आपण रेटिंग एजन्सी केअर यजच्या अहवालाचा विचार केला तर असे दिसून येते की चीनमध्ये कोविडच्या मर्यादांमुळे एफपीआयच्या किमती गेल्या बारा ते अठरा महिन्यांमध्ये बारा ते 25 टक्क्यांनी वाढल्या असल्याने जिलेटिन, सेल्युलोज, स्टार्च,  सुक्रोज आणि पॉलिथिलीन ग्लायकोल यासारखे एक्सपियंट्स 200% महाग झाली असून हे औषधी उत्पादनात डोस स्वरूपात वापरले जातात.

केंद्र सरकारने या वर्षी देशी फार्म कंपन्यांना स्वदेशी विकसित औषधांच्या किमतीमध्ये दहा टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची परवानगी दिली होती.

त्यामुळे बरेचसे पेन किलर आणि एंटीबायोटिक्स औषधांसोबत हार्ट अटॅक मध्ये उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुमारे आठशे औषधांच्या किमतीत सुमारे दहा टक्के वाढ झाली आहे. तसेच काही औषधांच्या किमतीत 55 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

नक्की वाचा:Election News: मतदान स्लिप आणि मतदानाची माहिती मिळणार आता मोबाईलवर, 1 ऑगस्टपासून मोहीम

English Summary: inflation entered in medical field so taking treatment are expensive Published on: 27 July 2022, 05:20 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters