देशात सर्वात जास्त टू व्हीलर गाडी वापरली जाते. देशातील बहुतांशी जनता टू व्हीलर बाइक वापरताना बघायला मिळते. देशात सर्वात जास्त मायलेज वाल्या बाईक खरेदी केल्या जातात, तसेच मध्यमवर्गीय कुटुंबे स्वस्त बाईक खरेदी करणे पसंत करतात. अनेक लोकांना स्वस्त किमतीत चांगल्या मायलेज देणार्या गाड्यांची आवश्यकता असते. सध्या देशात पेट्रोलच्या दरात मोठी वाढ झाली असल्याने मध्यमवर्गीयांच्या खिशाला कात्री बसत आहे. त्यामुळे वाढत्या इंधनाच्या दराचा विचार करता देशातील अनेक मध्यमवर्गीय कुटुंब नेहमीच मायलेज साठी उत्तम असलेल्या बाईक्सची खरेदी करत असतात.
जर आपणही स्वस्तात चांगली मायलेज देणारी बाईक खरेदी करण्याच्या विचारात असाल पण बाईक खरेदीसाठी आपल्या मनात गदारोळ माजला असेल तर आज आम्ही आपल्यासाठी भारतातील सर्वात स्वस्त व चांगल्या मायलेजच्या बाईक विषयी माहिती घेऊन आलो आहोत. भारतीय बाजारपेठेत कमी किमतीत उत्तम मायलेज देणार्या गाड्यांची एक मोठी लिस्ट आहे. आज आपण या मोठ्या लिस्टपैकी काही निवडक गाडीची माहिती जाणून घेऊया.
- भारतातील सर्वात स्वस्त आणि दमदार मायलेजच्या लिस्टमध्ये शीर्षस्थानी विराजमान आहे बजाज कंपनीची CT 100 ही बाईक. बजाज कंपनीची ही बाईक आपल्या मायलेज साठी देशात विशेष प्रचलित आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत रु. 58,925 हजार रुपये आहे. ही गाडी 80 किलोमीटर प्रति लिटर पर्यंत मायलेज देण्यास सक्षम असल्याचे ARAI द्वारे प्रमाणित केले गेले आहे.
- या लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे Hero कंपनीची Splendor iSmart ही बाईक. या गाडीची एक्स शोरूम किंमत रु. 69,650 हजार आहे. ही गाडी विशेषता आपल्या किमतिमुळे आणि मायलेजमुळे संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. ही गाडी 92 किलोमीटर प्रति लिटर एवढे मायलेज देत असल्याचे ARAI ने प्रमाणित केले आहे.
- या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे TVS कंपनीची Star CT Plus ही बाईक या गाडीची एक्स शोरूम किंमत 69,505 हजार रुपये आहे. ही गाडी वरील दोन्ही गाडी पेक्षा थोडे कमी मायलेज देते ARAI नुसार ही गाडी 86 किलोमीटर प्रति लिटर एवढे मायलेज देण्यात सक्षम आहे.
- या लिस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर जी गाडी आहे ती मध्यमवर्गीय कुटुंबासाठी सर्वात सूटेबल असल्याचे सांगितले जाते. या गाडीची ग्रामीण भागात विशेष मागणी आहे. आम्ही ज्या गाडी विषयी बोलत आहोत ती आहे बजाज कंपनीची प्लॅटिना 110 ही बाईक. या गाडीची एक्स शोरूम किंमत रुपये 62,598 हजार रुपये असून ही गाडी 84 किलोमीटर प्रति लिटर पर्यंत मायलेज देण्यास सक्षम असल्याचे ARAI ने प्रमाणित केले आहे.
- या लिस्टमध्ये पाचव्या क्रमांकावर Hero कंपनीची Super Splendor ही गाडी काबीज आहे. हीची एक्स शोरूम किंमत 73,900 हजार रुपये आहे. ARAI नुसार ही गाडी 83 किलोमीटर प्रति लिटर नुसार मायलेज देण्यास सक्षम असते. •या लिस्ट मध्ये सहाव्या क्रमांकावर आहे भारतात सर्वात जास्त विक्री केली जाणारी गाडी अर्थात Hero कंपनीची Splendor Plus ही गाडी. या गाडीची एक्स शोरूम किंमत 64,850 हजार रुपये आहे. ARAI नुसार ही गाडी 80.6 किलोमीटर प्रति लिटर एवढे मायलेज देण्यास सक्षम आहे.
Share your comments