समाजामध्ये बरेच व्यक्ती अशा आहेत की ज्यांना त्यांच्या कामानिमित्त वारंवार प्रवास करावा लागतो असे बरेच जण असतात की त्यांना लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी महिनाभर अगोदर रेल्वेचे तिकीट बुकिंग करण्याशिवाय पर्याय नसतो.
परंतु तिकीट बुकिंग करण्यामध्ये एक प्रकारची अगोदर समस्या होती. परंतु आता रेल्वेने एक निर्णय घेतला असून या निर्णयानुसार आता ही समस्या जवळ जवळ मिटणार आहे.
याबाबत भारतीय रेल्वेने एक निर्णय घेतला असून आता आय आर सी टी सी ॲप किंवा रेल्वेच्या संकेतस्थळावर तुम्ही जेव्हा तिकीट बुकिंग कराल, अशावेळी आता अगोदर असलेल्या मर्यादेपेक्षा दुप्पट तिकीट बुकिंग करता येणार आहे. या नियमानुसार तुम्ही आता एका महिन्यात पूर्वी पेक्षा दुप्पट तिकीट बुक करू शकता.
काय आहे आताचा नियम?
अगोदर जेव्हा तुम्हीआय आर सी टी सी यूजर आयडी वरून तिकीट बुक करत होतात तेव्हा तुम्हाला फक्त 6 तिकीट बुक करता येत होती.परंतु आता रेल्वेने ही मर्यादा वाढवली असून आता सहाऐवजी तुम्ही एका महिन्यात बारा तिकीट बुक करू शकतात.
याचा अर्थ असा की तुम्ही आता आय आर सी टी सी यूजर आयडी वरून एका महिन्यात बारा तिकीट बुक करू शकाल. रेल्वेच्या या निर्णयामुळे जे लोक नियमितपणे लांब अंतराचा प्रवास करत आताशा रेल्वे प्रवाशांना खूप मोठा फायदा होणार आहे.रेल्वेने तिकीट मर्यादा दुप्पट केली.
त्याचवेळी भारतीय रेल्वेच्या या निर्णयानंतर, एक व्यक्ती एका महिन्यात बारा तिकिटे बूक करु शकते. तर ज्या लोकांचे आय आर सी टी सी खाते आधार कार्ड ची लिंक आहे ते त्यांच्या आय आर सी टी सी यूजर आयडी ने एका महिन्यात 24 तिकिटे बूक करु शकतील.
अगोदर चक्क मी तिकीट बुकिंग वाऱ्यांमुळे बऱ्याच प्रवाशांना खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. विशेष करून ही समस्या वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जास्त येत होती. परंतु आता रेल्वेने बुकिंग मर्यादेत वाढ केल्यामुळे बऱ्याच प्रवाशांना आता याचा फायदा होणार आहे.
नक्की वाचा:कांद्याचा बाजार हस्तक्षेप योजनेत समावेश होणार? शेतकऱ्यांना अच्छे दिन येण्याची शक्यता
आयआरसीटीसी आयडी ला आधार लिंक करण्याची प्रोसेस
1- सगळ्यात आगोदर IRCTC अधिकृत ई तिकीटिंग संकेतस्थळाला भेट द्यावी. हे संकेतस्थळ irctc.co.in हे आहे.
2- यामध्ये लॉग इन करण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट करावा.
3- मुख्य पानावरील 'माय अकाउंट' या विभागातआधार केवायसी या पर्यायावर क्लिक करावे.
4- त्यात आता तुमचा आधार क्रमांक टाकावा आणि 'ओटीपी पाठवा'या पर्यायावर क्लिक करावे.
5-आधार कार्डवर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुमचा ओटीपी येईल.
6- हा ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर आवश्यक माहिती पाहिल्यानंतर खाली आलेल्या व्हेरिफाय बटनावर क्लिक करावे.
7- आता तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल की केवायसी तपशील यशस्वीरीत्या अपडेट केले गेले आहे.
Share your comments