1. इतर बातम्या

पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवा - कृषी मंत्री

बुलडाणा : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना ही सर्वाधिक लोकप्रिय झालेली सरकारची योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य देत असते. तीन महिन्यानंतर दोन - दोन हजार रुपयांचा हप्ता थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकला जातो.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


बुलडाणा : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना ही सर्वाधिक लोकप्रिय झालेली सरकारची योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य देत असते. तीन महिन्यानंतर दोन - दोन हजार रुपयांचा हप्ता थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकला जातो. यामुळे ही योजना पार्दर्शक योजना ठरली आहे. दोन हजार रुपयांनुसार वर्षाला हजार रुपयांची आर्थिक मदत सरकार करत असते. दरम्यान राज्यातील बऱेच शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.  याविषयीची माहिती राज्य कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

बुलडाणा येथे आढावा बैठक घेत असताना त्यांनी शेतकऱ्यांचा पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा  सहभाग वाढवावा , असे निर्देश दिलेत.  या जिल्ह्यात पंतप्रधान  शेतकरी सन्मान योजनेत चांगले काम झाले आहे., पण अजून बरेच शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत.  यावेळी  दादाजी भूसे म्हणाले की, पोकरा योजनेतील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी  जिल्हाधिकारी यांनी वरिष्ठ अधिकारी नेमून योदजनेच्या कामांचा अहवाल तयार करावा. स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतकऱ्यांच्या  कुटुंबातील  सात बारा उताऱ्यावर नोंद असलेल्या एका सदस्याचा समावेश करण्यात आला आहे.  दरम्यान नानाजी देशमुख कृषी  संजीवनी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कल्याणचे काम प्रभावीपणे होऊ शकते.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना - पीएम किसान योजनेसाठी कशी कराल नोंदणी   How to register for PM Kisan Yojana

आधी तुम्ही अधिकृत संकेतस्थळ www.pmkisan.gov.in/ यावर जावे. अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर होम पेज ओपन होईल. या होम पेजवर Farmers Corner हा पर्याय दिसेल यात Status of Self Registered/CSC Farmers स्वत: नोंदणी आणि सीएससी च्या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल.  या पेजवर शेतकरी आपले आधार नंबर, इमेज कोड, कॅच्चा कोड यादी गोष्टी भराव्यात.  सर्व माहिती भरल्यानंतर सर्च या बटनवर क्लिक करा. यानंतर आपल्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेची सद्य स्थितीची माहिती मिळेल.

पीएम - किसान योजनेसाठी कोणते कागदपत्र लागतात

  • आधार कार्ड
  • बँक खाते पासबुक
  • सातबारा उतारा
  • रहिवाशी प्रमाणपत्र

आपली नोंदणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी www.pmkisan.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन आपल्या अर्जाची, देयक आणि इतर तपशीलाचा माहिती वेळोवेळी माहिती घेतली पाहिजे.

English Summary: Increase farmers' participation in PM Kisan Yojana - Agriculture Minister Published on: 31 August 2020, 03:33 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters