सध्या आपल्याला माहित आहेच की, वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. जर आपण वेदांता फॉक्सकॉन कंपनीच्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचा विचार केला तर हा प्रकल्प 1.54 लाख कोटी रुपयांचा आहे. एवढेच नाही तर या प्रकल्पाच्या माध्यमातून तब्बल एक लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर या कंपनीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी भारतात बनलेल्या सेमीकंडक्टर मुळे लॅपटॉपच्या किमतीमध्ये मोठी घसरण होऊ शकते असे म्हटले आहे.
एका टीव्ही चॅनल ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की, भारतात जी काही सेमीकंडक्टर तयार होणार आहे त्यामुळे लॅपटॉपचे किमतींमध्ये मोठी घट येणार असून यामुळे एक लाख रुपयांचा लॅपटॉप 40 हजार रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी किमती देखील मिळू शकणार आहे.
सध्या ताइवान आणि कोरियामध्ये असलेला हा प्रकल्प भारतामध्ये सुरू होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.हा प्रकल्प सध्या गुजरातमध्ये होणारा असे त्यांनी जाहीर केले असून येणाऱ्या काळात महाराष्ट्रमध्ये देखील असले प्रकल्प करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र मध्ये लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहन तसेच मोबाईल फोन यांची निर्मिती करणार असल्याचे अनिल अग्रवाल यांनी म्हटले.
सध्या सेमीकंडक्टरच्या बाबतीत भारत 100% आयातीवर अवलंबून आहे. यासाठी भारताने 2020 यावर्षी 15 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे व यामधील 37 टक्के सेमीकंडक्टर चीनमधून आयात केले आहे.
नक्की वाचा:Agri News: 'या' जिल्ह्यामध्ये उभारण्यात येणार बांबू उद्योग, शेतकऱ्यांना होईल फायदा
Share your comments