भारतात कोरोनाच्या काळात केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) गरिबांसाठी मोफत रेशनची योजना सुरु केली. देशभरात हि योजना आजही चालू आहे. पीएम गरीब कल्याण अन्न योजना ह्या योजनेद्वारे गरिबाना मोफत रेशन पुरवले जात आहे. उत्तर प्रदेश राज्यातील रेशन कार्ड धारक व्यक्तींना देखील ह्या योजनेचा लाभ मिळत आहे शिवाय हि योजना युपी (Uttar Pradesh) मधील योगी सरकार 2022 पर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे त्यामुळे तेथील रेशन कार्ड धारक व्यक्तींसाठी हि एक आनंदाची बातमी आहे.
असे सांगितले जात आहे की येत्या विधानसभा मतदानला लक्षात ठेऊन राज्यातील योगी सरकार आपल्या नागरिकांना खुष करण्यासाठी अनेक योजना आणण्याच्या विचारात आहे. त्यापैकीच हि एक योजना आहे.
भारतात नोव्हेंबर पर्यंत मिळणार मोफत रेशन
संपूर्ण भारतात मोदी सरकारने अलीकडेच मोफत रेशनची केंद्राची पीएम गरीब कल्याण अन्न योजना (Pm Garib Kalyan Ann Yojna) नोव्हेंबर पर्यंत वाढवली होती पण प्रसार माध्यमातून आता असे वृत्त समोर येत आहे की हि योजना आता उत्तर प्रदेश राज्यात 2022 च्या मार्चपर्यंत चालू राहील. ह्याची घोषणा योगी लवकरच करणार आहेत असे सांगितले जात आहे.
योगी आदित्यनाथ यांनी योजनेचे केले गुणगान
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्राचे ह्या योजनेचे तोंड भरून कौतुक केले आहे. योगी यांनी आपल्या आमदारांच्या तसेच अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चेदरम्यान ह्या पीएम गरीब कल्याण अन्न योजनेचे कौतुक केले, तसेच हि योजना अशीच मार्च 2022 पर्यंत चालू राहावी असा सल्ला देखील दिला. ह्यावर स्वतः मुख्यमंत्री यांनी कुठलेही वक्तव्य नाही दिले परंतु आपल्या टीमसोबत त्यांनी ह्यावर चर्चा केली आहे तसेच टीमला ह्याविषयीं योजना बनवण्याचे निर्देश दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
योगी सरकार देणार दाळ तेल आणि मीठ
केंद्र सरकारच्या ह्या योजनेद्वारे प्रत्येक माणसाला 3 किलो गहु आणि 2 किलो तांदूळ दिले जातात. परंतु योगी सरकार ह्यामध्ये 1 किलो तेल, 1 किलो दाळ आणि मीठ हे देखील देण्याच्या विचारात आहे. प्रसार माध्यमातून समोर आलेली हि बातमी खरी झाली तर उत्तरं प्रदेशाच्या जनतेसाठी हि एक आनंदाची बातमी असेल आणि त्यामुळे थोडे दिवस का होईना गरिबांचे अच्छे दिन पाहावयास मिळतील.
Share your comments