आजच्या आधुनिक युगात नौकरीपेक्षा लोक बिजनेसला जास्त प्राधान्य देतांना दिसत आहेत. नौकरीपेक्षा जास्त कमाई हि व्यवसायातून केली जाऊ शकते, शिवाय बिजनेसमध्ये कुणाचा दबाव नसतो म्हणुन बिजनेसकडे अनेक नौजवान तरुण वळताना दिसत आहेत. असे असले तरी अनेक तरुणांना व्यवसाय करण्यासाठी कल्पना सुचत नाहीत, त्यामुळे त्या लोकांसाठी आजचा हा लेख फायदेशीर ठरू शकतो. आज आपण आशा दोन बिजनेस विषयी जाणुन घेणार आहोत जे की कमी पैशात सुरु करता येतात आणि त्यापासून चांगली मोठी कमाई देखील करता येते. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणुन घेऊया ह्या बिजनेस आयडिया विषयी.
दहा हजारात सुरु करता येणारे व्यवसाय
आईस्क्रीम पार्लर
अलीकडे लहान मुले असो किंवा मोठे माणसे प्रत्येकजण हा आईस्क्रीम खाने पसंद करतो. कुठल्याही ऋतुत आईस्क्रीम खाल्ली जाते. त्यामुळे आईस्क्रीम पार्लरचा व्यवसाय एक चांगला व्यवसाय सिद्ध होऊ शकतो. अनेक आईस्क्रीमप्रेमी आईस्क्रीम खाण्याचे फक्त निमित्त शोधत असतात त्यामुळे ह्या व्यवसायाला चांगला मोठा स्कोप बघायला मिळत आहे. ह्या व्यवसायासाठी गिऱ्हाईकची कमतरता भासणार नाही हा ह्या व्यवसायचा एक प्लस पॉईंट आहे. अलीकडे लग्न, वाढदिवस किंवा कुठल्याही कार्यक्रमात आईस्क्रीम खाण्याच्या मेन्यूमध्ये सामाविष्ट केला जातो. म्हणुन आईस्क्रीम पार्लर जर आपण उघडले तर आपणांस ह्या बिजनेसमधून चांगला फायदा होऊ शकतो. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी, तुम्हाला FSSAI कडून परवाना अर्थात लायसन्स घ्यावे लागेल आणि त्यासाठी आपणांस क्वालिटीचे काही मानक देखील पूर्ण करावे लागतील. हा व्यवसाय आपण सुरवातीला अवघ्या दहा हजार रुपयांच्या भांडवलमध्ये सुरु करू शकता. तसेच हा व्यवसाय आपण आपल्या घरातून देखील सुरु करू शकता.
कोचिंग इन्स्टिट्यूशन
कोचिंग अर्थात शिकवणी हे शाळकरी मुलांसाठी आवश्यक आहे. कोरोना काळात शाळा बंद होत्या त्यामुळे मुलांना शिक्षण घेण्यासाठी कोचिंगवरच जास्त भर होता. आता जरी शाळा पूर्वपदावर येत असल्या तरी मुलांना अभ्यासक्रम कव्हर होत नाही म्हणुन त्यांना एक्सट्रा क्लासेसची गरज भासते. त्यामुळे कोचिंगचा कल अलीकडे खूप वेगाने वाढला आहे.
जर तुम्हीहि सुशिक्षित असाल आणि तुम्हाला मुलांना शिकवण्याची आवड असेल तसेच तुम्हाला यातून कमाई देखील करायची असेल तर आपण कोचिंग इन्स्टिट्यूट उघडून चांगली कमाई करू शकता. याशिवाय तुम्ही तुमचा छंद जोपासून कमाई करण्याचा आनंद प्राप्त करू शकता. तुम्ही तुमच्या जवळच्या घरातील विद्यार्थ्यांना शिकवणी देऊन तुमच्या कोचिंग इन्स्टिटयूटची सुरवात करू शकता.
Share your comments