मित्रांनो जगात अनेक आश्चर्यकारक व विश्वास न बसणाऱ्या घटना घडत असतात. कोरोना काळात तर चीनमध्ये घडत असलेल्या अजीबोगरीब घटना मोठ्या चर्चेत होत्या. आतादेखील चीनमधून एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे. चीनमध्ये चक्क सापांचे पालन केले जाते हो मित्रांनो बरोबर ऐकताय तुम्ही! जसे आपण पशुपालन करत असतो त्या पद्धतीने चीनमधील एका गावात सापांचे पालन केले जाते व यातून चांगली मोठी कमाई केली जाते. चीनमधील जिसिकियाओ नामक गावात विसाव्या शतकापासून साप पालन केले जाते.
ऐकून शॉक बसला ना पण हे खरं आहे, चीनमधील या गावात 1980 पासून सापपालन केले जात आहे. या गावातील 170 कुटुंब साप पालन करत असतात, आणि जवळपास तीस लाख सापांची पैदास एका वर्षात तयार करत असतात. या गावातील नागरिक सापाचे पालन तसेच करतात जसे आपण पशुपालन करत असतो. जिसिकियाओ गावाला साप पालन करण्यासाठीच ओळखले जाते. या गावात किंग कोब्रा, वाइपर, रेटल स्नेक सारख्या अनेकोनेक विषारी सापांचे पालन केले जाते.
का बर करतात साप पालन?
चीनमधील या गावात साप पालन प्रामुख्याने पैशांसाठीच केले जाते, चीनमध्ये सापाच्या विषापासून अनेक प्रकारचे औषधे तयार केली जातात. यामुळे सापांना इथे मोठी मागणी असते. येथील लोक आजही पारंपरिक पद्धतीने आजारांवर औषधोपचार करत असतात. येथील पारंपारिक चिकित्सा पद्धतीत अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आणि जनावरांचा उपयोग केला जातो. सापा पासून सर्वप्रथम इसवी सन 100 मध्ये मानवावर उपचार करण्यात आला होता, तेव्हा मानवाला झालेल्या गंभीर त्वचेचा आजार बरा करण्यात आला होता.
त्वचेच्या आजारांत उपयोगात आणले जाणारे साप आता कॅन्सर सारख्या गंभीर आजारात देखील उपयोगात आणले जातात. चीनमध्ये अशी मान्यता आहे की सापपासून तयार करण्यात आलेले औषध मद्यपान करण्याच्या आधी घेतले असता मद्यपानाचा असर लिव्हर वरती होत नाही. परिणामी मद्यपान करणाऱ्या लोकांचे देखील लिव्हर तंदुरुस्त राहण्यास मदत होते. असे सांगितले जाते की 1918 साली चीनमध्ये स्पॅनिश फ्लू पसरला होता तेव्हा सापापासून मिळवण्यात आलेल्या तेला द्वारे या आजाराचा उपचार करण्यात आला होता.
या गावातील नागरिक सापाच्या प्रजनन पद्धतिचे अनुसरण करून सापांची पैदास तयार करतात आणि मग त्यांचे पालन पोषण करून मार्केटमध्ये विक्री करतात. या गावातील साप संपूर्ण चीनमध्ये व्यापारी द्वारा विक्री केले जातात. एवढेच नाही तर या गावाचे साप विदेशात देखील विकले जातात या गावातील साप प्रामुख्याने अमेरिका, जर्मनी, रुस आणि साऊथ कोरिया सारख्या देशात विक्रीसाठी पाठवले जातात.
Share your comments