भारत सरकार आपल्या नागरिकांसाठी अनेक दस्ताऐवज जारी करत असते, हे कागदपत्रे भारतीय नागरिक म्हणून आपल्यासाठी खुप महत्वाचे असतात. आपण या दस्तऐवजाद्वारे अनेक प्रकारचे लाभ घेत असतो. अनेक सरकारी तसेच निमसरकारी किंवा गैर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ह्या कागदपत्रांचा वापर केला जातो. म्हणून आपल्याकडे शासनाने दिले देही दस्ताऐवज असणे अनिवार्य असते. अनेकदा आपल्याकडे हे कागदपत्रे नसल्याने अनेक महत्त्वाच्या योजनेंचा लाभ आपल्याला मिळत नाही.
अशाच एका महत्वाच्या डॉक्यूमेंट पैकी आहे पॅनकार्ड, पॅन कार्ड हे वित्तीय कामासाठी एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. अनेक महत्त्वाच्या कामात पॅन कार्डचा उपयोग केला जातो तसेच पॅन कार्ड हे एक ओळखीचा पुरावा म्हणून देखील उपयोगात आणले जाते तसेच पॅन कार्डचा उपयोग करून अनेक बँकिंग कामे केली जातात. पॅन कार्ड हे भारत सरकारच्या आयकर विभागात आहे भारतीय नागरिकांना वितरित केले जाते. पॅन कार्ड बँकेत खाते खोलने पासून तर इतर अनेक महत्त्वाच्या कामांसाठी उपयोगात आणले जाते पण अनेक लोकांना पॅन कार्ड चे फायदे माहित नसतात त्यामुळे ते पॅन कार्ड देखील पण होत नाही म्हणून आज कृषी जागरण आपल्या वाचक मित्रांसाठी पॅन कार्ड चे फायदे व पॅन कार्ड कुठे कुठे उपयोगी पडते याविषयी सविस्तर माहिती घेऊन आले आहे चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया पॅन कार्ड चे फायदे.
पॅन कार्ड बनवण्याचे फायदे- सिबिल स्कोर ची माहिती मिळते- जर आपल्याला कुठलेही लोन प्राप्त करायचे असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपल्या सिबिल स्कोरची. जर आपला सिबिल स्कोर चांगला असेल तर आपल्याला सहजरीत्या लोन मिळू शकते. जर आपला सिबिल स्कोर हा गरजेपेक्षा कमी असेल तर आपणास लोन मिळू शकत नाही, म्हणून लोन मिळवण्यासाठी सिबिल स्कोर चांगला असणे अनिवार्य आहे.पॅन कार्डचा उपयोग करून आपण आपला सिबिल स्कोर चेक करू शकतो आणि या द्वारे आपल्याला समजते की आपण लोन घेण्यासाठी पात्र आहोत की नाही.
आपण घेतलेल्या लोनची माहिती मिळते- अनेक वेळेस लोक एकापेक्षा अधिक लोन घेतात, आणि म्हणून त्यांना त्या विषयीची माहिती हवी असते. म्हणून आपण आपला पॅन कार्डचा वापर करून माहिती घेऊ शकता की आपल्या अकाउंट वर किती लोन चालू आहेत.
बँकेत खाते खोलण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक असते-बँकेत खाते खोलण्यासाठी आपल्याला आणि कागदपत्रांची आवश्यकता भासते बँकेत खाते खोलने थर्टी आधार कार्ड पासपोर्ट साईज चे फोटो यासोबतच पॅन कार्ड देखील द्यावी लागते. पॅन कार्ड विना आपले कुठल्याच बँकेत खाते ओपन केले जाऊ शकत नाही त्यामुळे बँकेत खाते खोलण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक असते.
Share your comments