भारतात रेशन कार्ड एक अत्यावश्यक दस्तऐवज आहे, रेशन कार्ड विशेषता गरीब नागरिकांना स्वस्तात धान्य पुरवण्यासाठी सरकार द्वारे दिले जाते. रेशन कार्ड चा उपयोग धान्य देण्याव्यतिरिक्त देखील अनेक सरकारी कामात केला जातो. आज आम्ही रेशन कार्ड धारक व्यक्तींसाठी एक विशेष बातमी घेऊन आलो आहोत. या लेखात आपण रेशन कार्ड मध्ये किती लोकांची नावे जोडली गेली आहेत, हे कसे चेक करायचे हे जाणुन घेणार आहोत. हे जाणुन घेण्यासाठी आपणास कुठेच धावपळ करण्याची गरज नाही, आपण हे घरबसल्या जाणुन घेऊ शकता तेही अवघ्या काही मिनटात. चला तर मग जाणुन घेऊया याविषयीं सविस्तर.
खाद्य विभाग रेशन कार्डविषयी आपल्या नागरिकांसाठी ऑनलाईन माहिती उपलब्ध करून देते. आपण आपल्या रेशन कार्ड मध्ये कोणा कोणाची नावे आहेत ऑनलाइन घरबसल्या जाणून घेऊ शकता, यासाठी आपणास कुठेच सैरावैरा धावपळ करण्याची आवश्यकता नाही. चला तर मग जाणुन घेऊया याची प्रोसेस.
जर आपणास रेशन कार्ड मध्ये कोणा कोणाची नावे आहेत हे बघायचे असेल, तर आपणास सर्वप्रथम राज्य शासनाच्या खाद्य विभागाच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर वेबसाईटच्या महत्वपूर्ण लिंक या सेक्शनमध्ये जावे लागेल. येथे गेल्यानंतर लिस्ट मध्ये पात्रता लिस्ट या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. यानंतर आपणांस स्क्रीनवर सर्व्या जिल्ह्याची यादी नजरेस पडणार आहेत. यात आपला जिल्ह्याचे नाव सिलेक्ट करावे लागणार आहे.
त्यानंतर आपण शहरी भागात राहतात की ग्रामीण भागात राहतात हे सांगावे लागणार आहे. म्हणजे तालुका/ब्लॉक सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर आपणांस आपले पंचायत सिलेक्ट करावे लागणार आहे. येथे आपणांस रेशन कार्डची सर्वी माहिती नजरेला दिसेल. आता तुम्हाला आपल्या स्क्रीनवर सर्व रेशन कार्डची यादी दिसेल. यानंतर तुम्हाला तुमच्या सरपंचचे नाव सिलेक्ट करावे लागेल. यानंतर, नावासमोर दिलेला डिजीटल रेशन कार्डचा क्रमांक निवडा त्यात रेशन कार्ड क्रमांक प्रविष्ट करा. तुम्ही डिजीटल रेशनकार्ड क्रमांक निवडताच तुमच्या शिधापत्रिकेचा तपशील समोर येईल.
Share your comments