देशात सध्या स्कूटर खरेदी करण्यासाठी अनेक लोक पसंती दर्शवीत आहेत. डेली रुटीन साठी अनेकांना स्कूटर खरेदी करायची असते मात्र एकमुष्ट एवढी मोठी रक्कम स्कूटर खरेदी करण्यासाठी उपलब्ध नसल्याने अनेक लोकांचे स्कूटर खरेदी करण्याचे स्वप्न अपूर्ण राहत. जर आपणास देखील स्कूटर ची आवश्यकता असेल आणि स्कूटर खरेदी करायची असेल मात्र नव्याने स्कूटर खरेदी करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध नसेल तर आपण सेकंड हॅन्ड स्कूटर खरेदी करू शकता तेही अगदी कमी किमतीत. आज आम्ही आपणास best-selling स्कूटर कमी किमतीत कुठे खरेदी करायची या विषयी माहिती सांगणार आहोत. आपणास जुनी स्कूटर खरेदी करण्यासाठी कुठेच धावपळ करण्याची आवश्यकता नाही आपण जुनी स्कूटर ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या मागवू शकता.
हे देखील वाचा:-Hero HF Deluxe: हिरो एचएफ डीलक्स बाईक आता मिळणार फक्त 5 हजार रुपये डाउनपेमेंट वर
जर आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल तर आपण ऑनलाइन पद्धतीने सहजरीत्या आपल्या आवडीची जुने सेकंड हॅन्ड स्कूटर खरेदी करू शकता. जर आपणास सेकंड हॅन्ड स्कुटर खरेदी करायची असेल तर आपण फेसबुक वर जाऊन आपल्या आवडीची स्कूटर खरेदी करू शकता. फेसबुकच्या मार्केट प्लेस वरती आपण हिरो ज्युपिटर टीव्हीएस बजाज इत्यादी कंपनीच्या स्कूटर सहजरीत्या खरेदी करू शकता. या नामांकित कंपनीचे स्कूटर आपण फेसबुक मार्केटप्लेस वरती स्वस्तात खरेदी करू शकता. मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की फेसबुक वरती स्कूटर खरेदी कशी केली जाऊ शकते? असे असेल तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की फेसबुक मार्केट प्लेस हे अनेक वस्तूंच्या खरेदी-विक्री करण्यासाठी असलेले प्लॅटफॉर्म आहे.
यामध्ये सेकंड हॅन्ड स्कुटर सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध केल्या जातात, फेसबुक मार्केट प्लेस मध्ये अनेक लोक आपली सेकंड हॅन्ड बाईक, मोबाईल, कार इत्यादी विक्रीसाठी ठेवत असतात. इतर ऑनलाईन खरेदी-विक्रीच्या साईट प्रमाणे फेसबुक मार्केटप्लेस वर देखील वस्तूंची खरेदी विक्री केली जाते. परंतु फेसबुक मार्केट प्लेसमध्ये अनेक फसवणुकीच्या घटना उघडकीस आल्या आहेत, त्यामुळे स्कूटरची अथवा कुठल्याही वस्तूची खरेदी करताना कागदपत्रांची व्यवस्थित पडताळणी करणे अनिवार्य राहणार आहे.
हे देखील वाचा:- काय सांगता! फक्त 12 हजार रुपये द्या आणि घरी घेऊन जा 'ही' इलेक्ट्रिक स्कुटर; जाणुन घ्या याविषयी
आपणास जर फेसबुक मार्केट प्लेस वरचे स्कूटर खरेदी करायची असेल तर आपल्याला सर्वप्रथम फेसबुक मध्ये लॉगइन घ्यावे लागेल त्यानंतर फेसबुक मध्ये असलेल्या मार्केट प्लेस या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल मार्केटप्लेस या ऑप्शनवरती गेल्यानंतर आपणास अनेक प्रकारच्या सेकंड हॅन्ड स्कूटर, बाईक्स विक्रीसाठी दिसतील.
आपण या मार्केट प्लेस वरती आपल्या सोयीच्या प्राईस सेगमेंट मधील स्कूटर खरेदी करू शकता. फेसबुक मार्केट प्लेस मध्ये 12 हजार रुपयांपासून जुन्या सेकंड हॅन्ड स्कुटर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या ठिकाणी बारा हजार रुपये मध्ये 2009 वर्षाचे होंडा ॲक्टिवा स्कूटर विक्रीसाठी उपलब्ध आहे. याप्रमाणेच अनेक नामांकित कंपनीचे स्कूटर स्वस्तात फेसबुक मार्केट प्लेस वरती आपणास भेटुन जातील. मित्रांनो फेसबुक मार्केट प्लेस वर ती स्कूटर अथवा कुठलीही बाईक खरेदी करण्यापूर्वी कागदपत्रांची व्यवस्थित पडताळणी करणे अनिवार्य आहे नाहीतर आपल्या सोबत फसवणूक घडू शकते.
Share your comments