भारतात आधार कार्ड समवेतच पॅन कार्ड एक महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. आधार कार्ड व पॅन कार्ड चा वापर ओळखीच्या तसेच रहिवासाचा पुराव्यासाठी केला जातो. आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकांसाठी अनिवार्य आहे पॅन कार्ड देखील अनेक कामात उपयोगी पडते. पॅन कार्ड चा सर्वात जास्त उपयोग वित्तीय कामासाठी केला जातो. बँकिंग कामात पॅन कार्ड चा सर्वात जास्त वापर केला जातो. पॅन कार्ड आयकर भरण्यासाठी देखील अनिवार्य असते. एवढेच नाही तर बँकेत खाते खोलण्यासाठी देखील पॅन कार्ड अनिवार्य केले गेले आहे.
भारतात एका व्यक्तीसाठी एकच पॅन कार्ड जारी केले जाते. हे पॅन कार्ड भारत सरकारच्या आयकर विभागात द्वारे भारतीय नागरिकांना दिले जाते. मात्र असे असले तरी अनेकदा पॅन कार्ड हरवल्यास अथवा अन्य काही कारणाने काही लोक पॅन कार्ड साठी अँप्लाय करतात आणि त्यांच्याकडे चुकून दोन पॅन कार्ड येऊन जातात. परंतु दोन पॅन कार्ड ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि यासाठी भारत सरकार संबंधित व्यक्तीला दंडित देखील करु शकते. इन्कम टॅक्स अॅक्ट 1961 मधील कलम 272 B अंतर्गत तर एखाद्या व्यक्तीकडे दोन पॅन कार्ड आढळले तर त्या संबंधित व्यक्तीला दंड द्यावा लागणार आहे. एवढेच नाही तर संबंधित व्यक्तीचे बँक खाते देखील फ्रिज केले जाऊ शकते. त्यामुळे मित्रांनो जर आपल्याकडे ही दोन पॅन कार्ड असतील तर त्यातील एक पॅन कार्ड भारत सरकारच्या आयकर विभागाला परत करून द्या. नाही तर आपणास विनाकारण मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.
असे करा पॅन कार्ड परत
•मित्रांनो आता आपल्याकडे चुकून दोन पॅन कार्ड आले असतील तर त्या दोन पैकी एक पॅन कार्ड जमा करावी लागणार आहे त्यासाठी प्रक्रिया ही खूपच सोपी आहे. पॅन कार्ड परत करण्यासाठी एक कॉमन फॉर्म भरावा लागतो.
• कॉमन फॉर्म हा इन्कम टॅक्स च्या अधिकृत वेबसाईटवर आपणास उपलब्ध होईल. भारत सरकारच्या आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर. आपणास वेबसाईटच्या होम पेजवर 'Request for New PAN Card or/ And Changes or Correction in PAN Data' असा पर्याय नजरेस पडेल आपणास या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
•क्लिक केल्यानंतर आपणासमोर कॉमन फॉर्म डाउनलोड करण्यासाठी पर्याय उपलब्ध होईल, येथून कॉमन फॉर्म डाउनलोड करा.
•फॉर्म डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंटआऊट काढून घ्या आणि फॉर्म भरा आणि NSDL च्या कार्यालयात जमा करून द्या.
•कॉमन फॉर्म सोबतच पॅन कार्ड देखील तेथेच जमा करा
Share your comments