मित्रांनो आपल्या देशात मोदी सरकार 2014 मध्ये निवडून आले आणि त्यांनतर त्यांनी अनेक तडकाफडक निर्णय घेतले. अशाच एका निर्णयापैकी एक निर्णय होता नोटबंदीचा. मोदी सरकारने काळे धन नष्ट व्हावे ह्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे सांगितले जात होते. ह्या निर्णयामुळे नागरिकांना अनेक कष्ट सोसावे लागले होते. पण आज आम्ही आपणासाठी जुन्या नोटा संदर्भातील एक महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत.
जर आपल्याकडेही जुन्या 500 च्या नोटा असतील ज्या तुम्ही आठवणीसाठी सांभाळून ठेवल्या असतील अथवा काही कारणास्तव बदलल्या गेल्या नसतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ह्या जुन्या 500च्या नोटा तुम्हाला हजारो रुपये कमवून देऊ शकतात. हो खरंच! जर तुमच्याकडे 500 ची जुनी नोट असेल तर तुम्हाला त्याबदल्यात जवळपास 10000 रुपयापर्यंत पैसे मिळू शकतात. आज आपण ह्या गोष्टीविषयी सर्व माहिती जाणुन घेऊया.
500 च्या कोणत्या नोटवर मिळणार पैसे?
2016 मध्ये मोदी सरकारने नोटबंदी केली आणि 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा चलनातून बाहेर करण्यात आले. पण ह्या जुना नोटा आता आपल्याला लखपती सुद्धा बनवु शकतात. जर तुमच्याकडे 500 रुपयांची जुनी नोट असेल तर त्या नोटचे व्यवस्थित निरीक्षन करा तुमच्या नोटमध्ये दोनदा सीरियल नंबर छापलेला नसेल तर तुम्हाला त्या बदल्यात 5,000 रुपये मिळू शकतात. याशिवाय, जर या नोटचा साईज/आकार हा जास्त असेल, तर तुम्हाला त्याच्या बदल्यात आणखीन 5,000 रुपये एक्सट्रा मिळतील.
अशा प्रकारे तुम्हाला एका पाचशेच्या नोटेऐवजी 10,000 रुपये पर्यंत मिळतील. म्हणजे जर तुमच्याकडे 500 च्या 10 अशा नोटा असतील तर तुम्ही एक लाख रुपये पर्यंत कमाई करू शकता.
कुठे विकली जाते अशी नोट?
जर तुमच्याकडे वर सांगितलेल्या नोटासारखी 500 ची जुनी नोट असेल तर तुम्ही अशी नोट ऑनलाईन विक्री करू शकतात. अशी नोट ही Quicker नावाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विक्री केली जाऊ शकते Quicker व्यतिरिक्त आपण अशी नोट Coinbazzar.Com ह्या वेबसाईट वर देखील ऑनलाईन पद्धत्तीने विकु शकतात.
ह्या वेबसाईटवर सर्व्यात आधी तुम्हाला अकाउंट ओपन करावे लागेल त्यानंतर तुम्हाला तुमच्याजवळ असलेल्या नोटचे फोटो अपलोड करावे लागतील त्यानंतर ज्या व्यक्तींना अशा नोटांची आवश्यकता असते ते व्यक्ती तुम्हाला संपर्क करतील.
टीप : दिलेली माहिती ही आम्ही एका वेबसाइटवरून मिळवली आहे. ह्या बातमीची कृषी जागरण कुठल्याही प्रकारची हमी घेत नाही. दिलेल्या माहितीची सत्यता ही तपासून पाहावी धन्यवाद!
Share your comments