मित्रांनो कोरोना नामक महाभयंकर आजार हा अनेक लोकांसाठी प्रत्येक्ष व अप्रत्येक्षरित्या खुपच घातक सिद्ध झाला आहे. कोरोना मुळे अनेक लोकांचे रोजगार गेलेत, काही लोकांचे अक्षरशः खाण्याचे देखील वांदे झालेत. ह्या कोरोनामुळे भारतातील तसेच संपूर्ण जगातील प्रत्येक वर्गाच्या लोकांना मोठा फटका बसला आहे. पण सद्धया ऑनलाईन ई कॉमर्स साईट आपल्या भारतातील लोकांना घरबसल्या पैसे कमवण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. आज आपण हि संधी कोणती आणि आपण याचा कसा लाभ घेऊ शकतो हे जाणुन घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणुन घेऊया याविषयी सविस्तर.
मित्रांनो जसं की आपणांस ठाऊक आहे, भारत सरकारने कित्येक नोटा तसेच कॉइन हे चलनबाह्य केले आहेत तसेच अनेक नोटा व कॉइन ह्यांची छपाई तसेच निर्मिती बंद केली आहे. म्हणुन हे बंद झालेले नोट व कॉइन हे दुर्मिळ झालेले आहेत आणि अनेक कॉइन व नोट संग्रहीत करणारे हे दुर्मिळ नोट खरेदी करतात. त्यामुळे चलणबाह्य असलेल्या 1, 2, 5, 500,1000 इत्यादी नोटा यांची मागणी हि खुप असते. आणि ह्या चलनबाह्य नोटाची लाखो रुपयात बोली हि लागत असते, त्यांचा लिलाव हा होत असतो. मित्रानो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ह्या नोटांचा लिलाव कुठे आणि कसा होतो? मित्रांनो ह्या दुर्मिळ नोटांची बोली हि अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लागत असते.
मित्रांनो जर आपल्याकडेही चलनबाह्य जुन्या नोटा असतील तर आपण त्या घरबसल्या ऑनलाईन विकु शकता यासाठी आपण ebay तसेच Click India सारख्या वेबसाईट निवडू शकता. Ebay आणि click india सारख्या वेबसाईट ह्या नोटांची निलामी करत असते. मित्रांनो ह्या नोटांची विक्री व खरेदी करणे हे रिस्की असू शकते त्यामुळे याची विक्री व खरेदी करण्याआधी सत्यता तपासून पाहावी. तसेच रिजर्व बँक ऑफ इंडियाने (Bank Of India) ह्या नोटा विक्री करण्यासंदर्भात काही अलर्ट देखील लोकांसाठी जारी केला आहे. लोकांनी ह्या अलर्टची काळजी घ्यावी.
RBI चे काय आहे अलर्ट
भारतातील सर्वात मोठी बँक आरबीआयने चलनबाह्य झालेले नाणी आणि नोटांच्या विक्रीबाबत लोकांना सतर्क केले आहे.
वेबसाइटवर अशा चलनबाह्य दुर्मिळ नोटा आणि दुर्मिळ नाण्यांची ऑनलाइन विक्री दोन्ही पक्षांमधील वाटाघाटींवर अवलंबून असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामध्ये आरबीआयची कोणतीही भूमिका नाही म्हणजे नोटा विक्री व खरेदी करण्यात आलेला तोटा व फसवणूक ह्यात RBI ची कोणतीही जबाबदारी नाही. नोटा विक्री व खरेदी करणे टाळावे असे आरबीआय म्हणते. म्हणुन लोकांनी ह्या नोटा विक्री व खरेदी करण्याच्या भानगडीत पडू नये असे एकंदरीत RBI म्हणते.
टीप:- मित्रांनो कृषी जागरण ह्या लेखात दिलेल्या माहितीची पुष्टी करत नाही. ह्या प्रकारची खरेदी व विक्री हि जोखीमभरी असू शकते. सदर लेखात दिलेली माहिती हि एका वेबसाईटवरून घेतण्यात आली आहे.
Share your comments