1. इतर बातम्या

आयकर भरण्याची शेवटची मुदत हुकली,मग आता काय? काय आहेत त्यासंबंधीचे नियम,वाचा माहिती

आपल्याला माहित आहे या वर्षाचा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै होती. ही मुदत आता संपली असून विभागाने कुठलीही मुदत वाढ केली नाही. आयटीआर पडताळणी कालावधी आता 120 दिवसांवरून 30 दिवसांवर आणला गेला आहे. त्याची अधिसूचना 29 जुलै रोजी जारी करण्यात आली. अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी 15 ऑगस्टपर्यंत रिटन भरले नाहीत,त्यांचे काय होणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
income tax rule for late

income tax rule for late

 आपल्याला माहित आहे या वर्षाचा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै होती. ही मुदत आता संपली असून विभागाने कुठलीही मुदत वाढ केली नाही. आयटीआर पडताळणी कालावधी आता 120 दिवसांवरून 30 दिवसांवर आणला गेला आहे. त्याची अधिसूचना 29 जुलै रोजी जारी करण्यात आली. अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी 15 ऑगस्टपर्यंत रिटन भरले नाहीत,त्यांचे काय होणार असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

आयकर विभाग त्यांच्यावर काही कारवाई करू शकेल का किंवा त्यांना कर भरण्याची संधी कायम राहील इत्यादी अनेक प्रश्न बऱ्याच जणांना पडले असतील. या सगळ्या नियमां बद्दल या लेखात जाणून घेऊ.

 काय आहेत आयकर विभागाचे नियम?

1- दंडाची तरतूद- सरकारच्या नियमानुसार जे करदाते 31 जुलैपर्यंत त्यांचे कर विवरणपत्र करू शकले नाही त्यांना अद्याप प्राप्तिकर भरण्याची संधी आहे. 31 डिसेंबर पर्यंत आयकर भरता येतो मात्र मुदत संपल्यानंतर त्यासाठी दंड भरावा लागतो. 1961 च्या आयकर कायद्यानुसार 31 जुलै नंतर कर भरणाऱ्यांना कलम  234A अंतर्गत व्याजासह आयकर भरावा लागेल.

नक्की वाचा:7th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! DA थकबाकीवर सरकार देणार लाख नव्हे तर तब्बल इतके पैसे

2- कोणावर किती दंड असतो? यासाठी वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी दंडाची रक्कम वेगवेगळी असते. जसे की,

  1- ज्यांचे वार्षिक पगार पाच लाख रुपयांपर्यंत आहेत डिसेंबर पर्यंत एक हजार रुपयांच्या दंडासह रिटर्न भरू शकतात.

 2- ज्यांचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त आहे, अशा व्यक्तींना पाच हजार रुपयांच्या विलंब शुल्कासह रिटर्न भरता येणार आहे.

3- ज्यांचे वार्षिक उत्पन्न सवलत मर्यादेपेक्षा कमी आहे त्यांना कर विवरणपत्र भरण्यासाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही.

परंतु त्यामध्ये नवीन करप्रणाली अंतर्गत अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना आयकरातून सूट देण्याची तरतूद आहे. म्हणजे जर एखाद्या आयकर प्रदात्याची वार्षिक कमाई अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर त्याला आयटी रिटर्न भरण्यासाठी कोणताही विलंब शुल्क भरावे लागत नाही.

नक्की वाचा:Ration Card Holders: रेशन कार्ड धारकांना मोठा धक्का; मोफत धान्य सुविधा बंद होणार

 31 डिसेंबर पर्यंत रिटर्न भरला नाही तर….

जर करदात्यांनी 31 डिसेंबर पर्यंत सुद्धा आयकर रिटर्न भरला नाही तर त्यांना त्यांच्या प्रभागातील आयकर आयुक्तांसमोर क्षमादानासाठी अपील दाखल करावी लागते.

त्यानंतर त्यांना परतावा अथवा तोटा कॅरी फॉरवर्ड करण्याची परवानगी दिली जाईल. यासाठी आयकर विभागाने 'आयटीआर यु' फार्म आणला असून ज्यामध्ये ग्राहक अपडेट्सह रिटर्न भरू शकतात. यामध्ये त्याला उत्पन्नावरील कर उशिरा का जमा केला याचे कारण देखील स्पष्ट करावे लागते.

नक्की वाचा:Agri Update: आता सातबारा झाला पारदर्शक, 46 प्रकारचे दोष महसूल विभागाने केले दूर

English Summary: if not fill income tax return before due date thus that is rule important for that Published on: 02 August 2022, 03:48 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters