1. इतर बातम्या

तुमच्या आधार कार्डचा होऊ शकतो गैरवापर! आधार कार्ड लॉक करून थांबवा आधारचा गैरवापर; जाणुन घ्या प्रोसेस

भारतात आधार कार्ड एक अनिवार्य डॉक्युमेंट बनले आहे. आधार कार्ड 28 जानेवारी 2009 रोजी भारतात चालू करण्यात आले, काँग्रेसच्या काळात आधार कार्डची अभूतपूर्व सुरवात करण्यात आली. तेव्हापासून ते आजपर्यंत आधार भारतीय नागरिकांसाठी एक महत्वाचे कागदपत्र बनले आहे. आधार सर्व सरकारी कामात उपयोगी पडणारे एक महत्वाचे दस्ताऐवज आहे. याचा वापर बँकिंग क्षेत्रात, सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी, पैसे काढण्यासाठी, बँकेत अकाउंट ओपन करण्यासाठी, शाळेत, महाविद्यालयात नाव दाखल करण्यासाठी इत्यादी महत्वाच्या कामात केला जातो.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
adhaar card

adhaar card

भारतात आधार कार्ड एक अनिवार्य डॉक्युमेंट बनले आहे. आधार कार्ड 28 जानेवारी 2009 रोजी भारतात चालू करण्यात आले, काँग्रेसच्या काळात आधार कार्डची अभूतपूर्व सुरवात करण्यात आली. तेव्हापासून ते आजपर्यंत आधार भारतीय नागरिकांसाठी एक महत्वाचे कागदपत्र बनले आहे. आधार सर्व सरकारी कामात उपयोगी पडणारे एक महत्वाचे दस्ताऐवज आहे. याचा वापर बँकिंग क्षेत्रात, सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी, पैसे काढण्यासाठी, बँकेत अकाउंट ओपन करण्यासाठी, शाळेत, महाविद्यालयात नाव दाखल करण्यासाठी इत्यादी महत्वाच्या कामात केला जातो.

आधार कार्डविना भारतात सिम देखील खरेदी करता येत नाही यावरून आपण आधार कार्डची उपयोगिता किती आहे याचा अंदाज बांधू शकतो. आधार कार्ड सर्व गव्हर्नमेंट जसे की, पीएम आवास योजना, रेशन कार्डसाठी, पीएम किसान सन्मान निधी योजना इत्यादी कामात अनिवार्य असते. अशा महत्वाच्या डॉक्युमेंटचा अनेक चालाक लोक गैरवापर करतात, त्यामुळे आपण मोठ्या संकटात सापडू शकतात. पण जर आपणास ह्या अशा फसवेगिरीपासून किंवा गैरवापरापासून वाचायचे असेल तर आपल्याला तुरंत आपले आधार कार्ड एवं बायोमेट्रिक लॉक करून घ्यायला हवे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आधार कार्ड लॉक कसे बरं करायचे? बरोबर ना, अहो मग डोन्ट वरी कृषी जागरण आहे ना! कृषी जागरण आपल्या वाचक मित्रांसाठी आधार कार्ड कसे लॉक करायचे याविषयीची महत्वपूर्ण माहिती घेऊन आले आहे. चला तर मग जाणुन घेऊया आधार कार्ड लॉक करण्याची संपूर्ण प्रोसेस….

आधार कार्ड लॉक करण्याची प्रोसेस...

»आपण जर आपले आधार कार्ड लॉक करू इच्छित असाल तर, सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये आपणांस MAadhar नावाचे अँप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल. यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोर मध्ये जाऊन हे अँप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल.

»मित्रांनो आपण आपल्या मोबाईलमध्ये अँप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आपणास त्या अँप्लिकेशन मध्ये जायचे आहे. अँप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर आपल्या समोर एक पेज ओपन होईल. तिथे आपणास 4 अंकी पिन सेट करावा लागेल. तो पिन हा काळजीपूर्वक टाकावा आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवावा कारण की जेव्हा पण आपण ह्या अँप्लिकेशन मध्ये एन्ट्री कराल तेव्हा हा पिन आपल्याला विचारला जाईल. त्याविना हे अँप्लिकेशन ओपन होणार नाही.

»पिन सेट केल्यानंतर, यशस्वीपणे लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला समोर MAadhaar लिहिलेले दिसेल. त्याच्या खाली तुम्हाला 12 अंकी आपला आधार क्रमांक टाकावा लागेल. आधार क्रमांक यशस्वीरीत्या टाकल्यानंतर लगेचच दुसऱ्या पेजवर तुमचे डिजिटल आधार कार्ड उघडेल. ह्या डिजिटल आधार कार्डच्या तळाशी MY Aadhaar असे लिहिलेले दिसेल. ह्या My Aadhar ह्या पर्यायावर क्लिक करताच तुम्हाला पिन भरावा लागेल. तुम्ही पिन यशस्वीरीत्या भरताच तुमच्यासमोर एक दुसरी स्क्रीन उघडेल.

»मित्रांनो आधार आणि बायोमेट्रिक लॉक करण्यापूर्वी तुम्हाला तुमचा व्हर्च्युअल आयडी तयार करावा लागेल.

व्हर्च्युअल आयडी तयार करण्यासाठी तुम्हाला समोर दिलेल्या 5 पर्यायांपैकी तिसऱ्या क्रमांकावर जावे लागेल. येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांकाशी लिंक असलेला मोबाईल नंबर द्यावा लागेल. मोबाईल नंबर टाकला की, तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल आणि मग आपोआप तुमचा व्हर्च्युअल आयडी तयार होईल. मित्रांनो हा आयडी लक्षात ठेवा. तुम्ही हा आयडी एका सुरक्षित ठिकाणी लिहून देखील ठेवू शकता.

»व्हर्च्युअल आयडी तयार झाला की आपण याच्या मदतीने आधार कार्ड तसेच आपले बायोमेट्रिक लॉक करू शकता.  तुमचे आधार लॉक झाल्यानंतर कोणतीही व्यक्ती तुमच्या इच्छेशिवाय आधार कार्ड डाउनलोड करू शकणार नाही.  तसेच बायोमेट्रिक लॉकिंगमुळे, कोणीही तुमचा अंगठा लावून आधार स्कॅन करू शकणार नाही. जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही आधार आणि बायोमेट्रिक अनलॉक करू शकता.

English Summary: if misuse of your adhaar card can lock by this process Published on: 17 November 2021, 09:59 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters