नमस्कार मित्रांनो! भारतात आधार कार्ड एक अत्यावश्यक दस्ताऐवज आहे. बँकेत खाते खोलण्यापासून तर पैसे काढण्यापर्यंत प्रत्येक बँकिंग कामात आधार अनिवार्य आहे. कोणत्याही सरकारी योजनाचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड खुपच गरजेचे आहे. गॅस कनेक्शन घेण्यासाठी, शाळा कॉलेज मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी, शिष्यवृत्ती घेण्यासाठी, आवास योजनेसाठी, पॅन कार्ड काढण्यासाठी तसेच इत्यादी महत्वाच्या सरकारी कामासाठी आधार कार्ड एक प्रमुख डॉक्युमेंट आहे.
ह्या अशा उपयुक्त डॉक्युमेंट विषयी अनेक लोकांच्या काही समस्या आहेत ह्याचे निराकरण करण्यासाठी आधार केंद्राला भेट द्यावी लागते! पण आता ह्या आधार विषयी असलेल्या समस्या केवळ सेकंदात सॉल्व्ह केल्या जाऊ शकतात. त्या पण घरबसल्या एक फोन कॉलद्वारे. आधार कार्ड संबंधी काम करणारी संस्था UIDAI ने आपल्या ऑफिसिअल ट्विटर हॅन्डल वरून ह्याविषयीं माहिती दिली. UIDAI सांगितलं की, 1947 ह्या टोल फ्री क्रमांक वर कॉल करून आता आधार कार्ड विषयी असलेल्या अडचणी सोडवण्यात येतील.1947 ह्या नंबर वर जवळपास 12 भाषेचा पर्याय उपलब्ध असेल.
UIDAI ने आपल्या ऑफिसिअल अकाउंट वरून केल ट्विट
UIDAI ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून ट्विट केले की, आता आधारशी संबंधित सर्व समस्या केवळ एका फोन कॉलवर सोडवल्या जातील. त्यासाठी आधार हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. आधार विषयी समस्या सोडवण्यासाठी 1947 हा टोल फ्री नंबर जारी करण्यात आला आहे. हा नंबर जवळपास 12 भाषा मध्ये उपलब्ध आहे. हा नंबर हिंदी, इंग्रजी, तेलगू, कन्नड, तमिळ, मल्याळम, पंजाबी, गुजराती, मराठी, उडिया, बंगाली, आसामी आणि उर्दू या 12 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.
1947 ह्या नंबर वर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाषेत संवाद साधू शकता आणि आपल्या आधार विषयी असलेल्या समस्या विचारू शकता आणि त्या घरबसल्या एका कॉलवर सोडवू शकतात.
टोल फ्री नंबर 1947 कोणत्या सुविधा पुरवते
1947 हा टोल फ्री क्रमांक भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) जारी केला आहे. हा नंबर लोकांच्या सहज लक्षात राहावा म्हणुन 1947 असा ठेवण्यात आला आहे. 1947 हे वर्ष आपल्यासाठी ऐतिहासिक आहे कारण ह्या वर्षी आपला देश इंग्रजांच्या गुलामामधून मुक्त झाला आणि आपण स्वातंत्र्य झालो. त्यामुळे हा नंबर कोणीही सहज लक्षात ठेऊ शकतो.
हा 1947 क्रमांक टोल फ्री अर्थात विनामूल्य आहे जो वर्षभर IVRS मोडवर चोवीस तास उपलब्ध असेल आणि आधार कार्ड धारक व्यक्ती ह्याचा उपयोग करून लगेच आपल्या समस्या सोडवू शकतात. तसेच या सुविधेसाठी कॉल सेंटरचे प्रतिनिधी सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत उपलब्ध असतात. रविवारी हा क्रमांक मात्रहा 1947 क्रमांक विनामूल्य आहे जो वर्षभर IVRS मोडवर चोवीस तास उपलब्ध असतो.
तसेच या सुविधेसाठी कॉल सेंटरचे प्रतिनिधी सकाळी 7 ते रात्री 11 (सोमवार ते शनिवार) उपलब्ध आहेत. त्याचबरोबर रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत चालू असतो. तसेच इतर वेळी म्हणजे सोमवार पासुन शनिवार पर्यंत हा नंबर 7 ते 11 चालू असतो.
1947 हा हेल्पलाइन क्रमांक जर समजा आपण आधार केंद्रावर नोंदणी केली असेल तर त्या आधार कार्डची स्थिती अर्थात आधार कार्ड केव्हा प्राप्त होईल इत्यादी विषयी माहिती आपल्याला पुरवेल. तसेच आधार संबंधी इतर माहिती देखील ह्या टोल फ्री नंबर द्वारे आपण प्राप्त करू शकता. ह्या नंबरवर कॉल करून जर कोणाचे आधार कार्ड हरवले असेल किंवा पोस्टाने अद्याप मिळाले नसेल तर त्याविषयीं जाणुन घेऊ शकता.
Share your comments