1. इतर बातम्या

गॅस सिलेंडर मुळे अपघात झाल्यास मिळणार पन्नास लाखांची भरपाई, अशा पद्धतीने करू शकता क्लेम

सध्या प्रत्येकाच्या घरात गॅस सिलेंडर असते. गॅस सिलेंडर चा वापर करताना विशेष खबरदारी घ्यावी लागते. जर निष्काळजीपणामुळे कुठल्याही प्रकारचे दुर्घटना घडली तर तेव्हा काय करावे याबद्दलची सविस्तर माहिती या लेखात घेऊ.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
gas cylinder

gas cylinder

सध्या प्रत्येकाच्या घरात गॅस सिलेंडर असते. गॅस सिलेंडर चा वापर करताना विशेष खबरदारी घ्यावी लागते. जर निष्काळजीपणामुळे कुठल्याही प्रकारचे दुर्घटना घडली तर तेव्हा काय करावे याबद्दलची सविस्तर माहिती या लेखात घेऊ.

 मिळतो 50 लाखांपर्यंतचा इन्शुरन्स

 एलपीजी कनेक्शन घेतल्यावर पेट्रोलियम कंपन्या ग्राहकांना पर्सनल ॲक्सिडेंटल कव्हर  देतात.एलपीजी सिलेंडर मधून गॅस गळती किंवा स्पोट झाल्यामुळे अपघात झाल्यास 50 लाख रुपयांपर्यंतचा इन्शुरन्स आर्थिक मदतीच्या स्वरूपात आहे. या इन्शुरन्स साठी पेट्रोलियम कंपन्यांची इन्शुरन्स कंपन्यांशी भागीदारी आहे. डिलिव्हरी पूर्वी डीलर आणि सिलेंडर पूर्णपणे ठीक आहे कि नाही ते तपासावे. ग्राहकाच्या घरी एलपीजी सिलेंडर मध्ये झालेल्या अपघातात जीवित आणि मालमत्तेचे हानी साठी पर्सनल ॲक्सिडेंटल कवर देणे आहे.अपघातात ग्राहकांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्यास प्रति अपघात दोन लाख रुपयांपर्यंतचा इन्शुरन्स क्लेम उपलब्ध आहे.

गॅस सिलेंडर वर पन्नास लाखांचा क्लेम कसा मिळवावा?

 अपघातानंतर क्लेम करण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाईट https://mylpg.inवर दिली आहे. वेबसाईट नुसार ग्राहकाला मिळालेल्या सिलेंडर मधून एलपीजी कनेक्शन मिळाल्यास त्याच्या घरात एखादा अपघात झाला तर ती व्यक्ती 50 लाख रुपयांपर्यंतचा इन्शुरन्सलापात्र ठरते.

1-अपघात झाल्यास  जास्तीत जास्त 50 लाख रुपयांपर्यंतचे भरपाई मिळू शकते. अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त दहा लाख रुपयांची भरपाई दिली जाऊ शकते.

2- एलपीजी सिलेंडर चे इन्शुरन्स कव्हर मिळवण्यासाठी ग्राहकाने तात्काळ जवळच्या पोलिस स्टेशनला आणि त्याच्या एलपीजी वितरकाला अपघाताची माहिती द्यावी.

 

3- इंडियन ऑइल, एचपीसी आणि बी पी सी सारख्या पी एस यु ऑइल मार्केटिंग कंपन्यांच्या वितरकांना व्यक्ती आणि मालमत्ता साठी थर्ड पार्टी इन्शुरन्स कव्हर सहा अपघातासाठी इन्शुरन्स पॉलिसी घ्यावी लागते.

4-हे कोणत्याही वैयक्तिक ग्राहकाच्या नावावर नसते, मात्र प्रत्येक ग्राहक या पॉलिसीमध्ये समाविष्ट असतो. यासाठी त्याला कोणताही प्रीमियम भरावा लागत नाही.

5- मृत्यू झाल्यास एफ आय आर ची कॉपी, मेडिकल बिले आणि जखमींची मेडिकल बिले आणि पोस्टमार्टम रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपत्र सोबत ठेवा.( स्त्रोत- मीE शेतकरी)

English Summary: if any accident occure in gas incident you can take benifit of insurense Published on: 13 November 2021, 02:20 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters