भारतात पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे दोन्ही अति महत्त्वाचे कागदपत्रे बनले आहेत. आधार कार्ड शिवाय भारतात एक सिम कार्ड देखील खरेदी केली जाऊ शकत नाही तसेच पॅन कार्ड हे वित्तीय कामात सर्वात महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे. हे दोन्ही डॉक्युमेंट बँकेत खाते ओपन करण्यासाठी तसेच ई-केवायसी करण्यासाठी, डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी, शाळा महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी, शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी, तसेच विविध सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असतात. भारत सरकारने या दोन्ही महत्त्वाचे डॉक्युमेंट ला लिंक करणे अनिवार्य केले आहे.
जर पॅन कार्ड आधार सोबत लिंक नसेल तर ते पॅन कार्ड मिरज ते केले जाईल असे देखील सरकारने स्पष्ट केले आहे. म्हणून अनेक लोकांनी आपले पॅन कार्ड आधार सोबत लिंक केले आहे मात्र असे असले तरी अद्यापही अनेक लोकांनी आपले पॅन कार्ड आधार सोबत लिंक केलेले नाही. पॅन कार्ड आधार सोबत लिंक न करण्याचे अनेक कारणे असू शकतात मात्र सर्वात कॉमन कारण हे आधार कार्ड आणि पॅन कार्ड या दोन्ही डॉक्युमेंट वर वेगवेगळ्या जन्मतारीख असणे हे आहे. अनेक लोकांच्या जन्मतारखा या दोन्ही डॉक्युमेंट वर भिन्नभिन्न असल्याने त्यांनी अद्याप पर्यंत आधार सोबत पॅन कार्ड लिंक केलेले नाही त्यामुळे आज कृषी जागरण अशा लोकांसाठी महत्त्वाची माहिती घेऊन आले आहे आज आपण जर आधार कार्ड व पॅनकार्ड वर भिन्न-भिन्न जन्मतारखा असतील तर पॅन कार्ड आधार सोबत कसे लिंक करायचे याविषयी जाणून घेणार आहोत.
मित्रांनो जर आपल्या ही आधार व पॅन कार्ड वर वेगवेगळ्या जन्मतारखा असतील आणि त्यामुळे पॅन कार्ड आधार सोबत लिंक करता येत नसेल तर चिंता करू नका आज आपण आधार व पॅन कार्डवर दिनदिन जन्मतारखा असताना देखील लिंकिंग कसे करायचे याविषयी जाणून घेणार आहोत. जर आपल्या आधार व पॅन कार्ड वर वेगवेगळ्या जन्मतारखा असतील आणि आपणास पॅन कार्ड आधार सोबत लिंक करायचे असेल तर सर्वप्रथम या दोन्ही डॉक्युमेंट वरील जन्मतारखा दुरुस्त करणे अपरिहार्य आहे. यासाठी आपल्याला एक सेल्फ अटेस्टेड जन्मतारखेचा पुरावा सादर करून आधार व पॅन कार्ड वरील जन्मतारीख एक करावी लागेल.
आधार कार्ड पॅन कार्ड वरील जन्मतारीख बदलण्यासाठी आपणास एक तर ऑनलाइन आवेदन करता येऊ शकते नाही तर आपण जवळच्या आधार केंद्र किंवा पॅन कार्ड सेवा केंद्रला जाऊन दुरुस्ती करू शकता.आपल्याला यासाठी काही नाममात्र शुल्क देखील भरावा लागेल. अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी आपल्या डॉक्युमेंट वरील जन्म तारीख बदलली जाईल जन्मतारीख बदलल्यानंतर आपण सहज रित्या आधार सोबत पॅनकार्ड लिंक करू शकता.
Share your comments