1. इतर बातम्या

आधार कार्ड खरे आहे की Fake ? कसे ओळखाल आपले आधार; जाणून घ्या ! पद्धत

सरकारी कामांसाठी आधार कार्ड खूप महत्त्वाचे आहे. मोबाईल सिम कार्ड घेणे असो किंवा सरकारी , खासगी नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी किंवा बँकेत खाते उघडण्यासाठी आधार कार्ड महत्त्वाची असते.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


सरकारी कामांसाठी आधार कार्ड खूप महत्त्वाचे आहे.  मोबाईल सिम कार्ड  घेणे असो किंवा सरकारी , खासगी नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी किंवा बँकेत खाते उघडण्यासाठी आधार कार्ड महत्त्वाची असते. परंतु आधार कार्ड बनावट बनत  असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कारण अन अधिकृत ऑपरेटर्स आधार कार्ड बनवत  आहेत.  यामुळे आपल्याला सतर्क राहिले पाहिजे. यामुळे आपले आधार कार्ड बनावट आहे का खरे याची पडताळणी करणे गरजेची आहे.

नकली आधार कार्डचा खेळ

काही लोक आधारला कॉम्प्युटर मध्ये एडिट करु फोटो बदलत असतात. काही पैशांसाठी  बनावट आधार कार्ड बनवत असतात.  अशात आधार कार्ड असली आहे का नकली हे आपण ऑनलाईन तपासून पाहू शकतात.

आपल्या युआयडीआयच्या अधिकृत  वेबसाईट  https://resident.uidai.gov.in/offlineaadhaar  वर जावे.   स्क्रिन मध्ये आपले आधार क्रमांक किंवा वीआयडी  आणि सुरक्षा कोड टाकावे. आता  सेड ओटीपी वर क्लिक करावे.  ओटीपी हे आधार नंबर किंवा वीआयडीसाठी नोंदणी मोबाईल नंबरवर पाठवले जाईल.  जर आपला आधार नंबर बरोबर असले तर नवे पेज उघडेल.  त्यानंतर आपले आधार नंबर सांगत मेसेज येईल.

हेही वाचा : Aadhaar Card मध्ये विना कागदपत्राद्वारे अपडेट करा आपला पत्ता

याप्रमाणे आपल्या आधार कार्डाचा क्रमांकाची पडताळणी केली जाऊ शकते.  आधार संबंधित  ऑनलाईन माहितीसाठी  मोबाईल नंबर नोंदणी असणे आवश्यक असते. दरम्यान तुम्ही आपले इमेल आयडी आणि मोबाईल नंबर देखील पडताळणी करु शकता. दरम्यान आपण विना कागदपत्राशिवाय आधार कार्ड अपडेट करु शकतो.

English Summary: How to identify a fake Aadhaar card Published on: 17 September 2020, 03:19 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters