1. इतर बातम्या

मोबाईलद्वारे पंतप्रधान पीक विम्याचा कसा मिळवाल लाभ

यावर्षी झालेल्या सततच्या पावसामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. काढणीच्या अगोदर जर कोणत्याही पिकाची आणि होत असल्यास पंतप्रधान पीक विमा योजनेतून भरपाई मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून अर्ज करता येऊ शकतो.

KJ Staff
KJ Staff


यावर्षी झालेल्या सततच्या पावसामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. काढणीच्या अगोदर जर कोणत्याही पिकाची आणि होत असल्यास पंतप्रधान पीक विमा योजनेतून भरपाई मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून अर्ज करता येऊ शकतो. नुकसान भरपाईसाठी दावा करता येऊ शकतो. मोबाईलवरून पीक विमासाठी अर्ज कसा करावा, हे आपण या लेखात पाहू.

सगळ्यात अगोदर आपण आपल्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन तेथे सर्च ऑप्शनमध्ये ‘Crop Loss’ असे टाइप करावे. त्यानंतर ‘इंस्टॉल’ शब्दावर क्लिक करावे. त्यानंतर ३.५८ एमबीचे एक ॲप्लिकेशन डाऊनलोड होईल.  क्रॉप इन्शुरन्स नावाचे ॲप डाउनलोड झाल्यावर ‘ओपन’ वर क्लिक करून त्यानंतर इंग्रजी मधून ‘’प्रधानमंत्री फसल बीमा योजना’’ असे पेज उघडेल. त्यानंतर या उघडलेल्या पानावर ‘चेंज लॅग्वेज’वर क्लिक करावे. त्यानंतर तीन पर्याय समोर येतात. त्यामध्ये आपण मराठी या भाषेत या पर्यायावर क्लिक करून त्याखाली ‘अप्लाय’ शब्दावर क्लिक क्लिक करुन ‘ओके’ शब्दावर क्लिक करावे. त्यानंतर ओपन क्लिक करून त्यानंतर आपल्याला मराठीमध्ये सगळ्या प्रकारचे ऑप्शन दिसतात. त्यापैकी नोंदणी खात याशिवाय काम सुरू ठेवा

या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर पीक नुकसान या ऑप्शनवर क्लिक करून दोन पर्याय त्यानंतर येतात. यापैकी पीक नुकसानीची पूर्वसूचना यावर क्लिक करावे. त्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकाचे पडताळणी होते. त्यासाठी दिलेल्या एका कॉलममध्ये आपल्या मोबाइल क्रमांकाची नोंद करावी. ओटीपी पाठवा यावर क्लिक करून ओटीपी नंबरसाठी थोडावेळ प्रतीक्षा करा. त्यानंतर ऑटोफिल कोड येतो. हे सगळे झाल्यानंतर हंगामाची यादी येते. यामध्ये खरीप हंगामात क्लिककरून वर्षांच्या पर्यायांमधून 2020 या वर्षाच्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर योजना असा पर्याय येतो. त्यात ‘प्रधानमंत्री फसल बीमा योजना’ वर क्लिक करा. त्यानंतर राज्य येथे त्यामध्ये ‘महाराष्ट्र राज्य’ वर क्लिक करून शेवटी ‘निवडा’ या शब्दावर क्लिक करावे.  यानंतर अर्जाचा स्त्रोत असे पान ओपन होते. त्यामध्ये बँक, सी एस सी, फार्मर ऑनलाईन असे शब्द येतात. अशावेळी आपण यापूर्वीचा ‘विमा अर्ज कुठे भरला होता’ त्यानंतर शब्दावर क्लिक करावे. समजा बँकेमधून भरला असल्यास बँक या शब्दावर क्लिक करावे. बँक या शब्दावर क्लिक केल्यानंतर अर्ज पॉलिसी क्रमांक द्यावा.

आपण जेव्हा पीक विमा नोंदवतो.तेव्हा प्रत्येकाला पॉलिसी क्रमांक मिळतो तो क्रमांक अचूक भरावा. त्यानंतर यशस्वी या पर्यायावर क्लिक करावे. यानंतर यादीतून अर्जाची निवड करा, अशा प्रकारची ओळ येते.

 


त्या खाली ‘इतर पर्याय निवडा’ अशी ओळ असून त्यावर क्लिक केल्यावर आपण पॉलिसी क्रमांकावरील नाव, जिल्हा, खाते क्रमांक, विमा हप्ता अशी माहिती दिसते. यानंतर खालील पिकांची नावे यावर क्लिक करावे.  या सगळ्या नंतर लोकेशन मागितले जाते, त्यासाठी ओके या शब्दावर क्लिक करा. यानंतर घटनेचा प्रकार कसा शब्द येतो. त्यावर रेट केल्यानंतर ॲनिमल इन्फस्टेशन, क्लाऊड बर्स्ट, सायक्लोन, सायकलोनिक रेन्स, डिसीज, एक्स्ट्रा रेन फॉल अशा प्रकारचे पर्याय येतात. वरील पर्यायांपैकी आपल्याला काढणी पश्‍चात पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी दावा करायचा आहे. त्यामुळे सायकलोनिक रेंज या पर्यायावर क्लिक करून त्यानंतर घटनेचा दिनांक टाकावा.

पाऊस पडल्याची आणि नुकसान झाल्याची तारीख नोंद करावी. त्यानंतर ओके शब्दावर क्लिक करावे. त्यानंतर घटनेच्या वेळेस पीक वाढीचा टप्पा अशी ओळ येते. त्याखाली दिलेल्या चौकटीत सिलेक्ट वर क्लिक करावे. तेथे स्टॅंडिंग क्रोप, हर्वेस्तेड, कट अँड स्प्रेड बंडल कंडिशन फॉर ड्रॉईंग असे पर्याय समोर येतात. त्यापैकी सोयाबीन समजा कापून ठेवले असेल तर कट अँड स्प्रेडवर क्लिक करावे. त्यानंतर याच पानावर नुकसान भरपाईची संभाव्य टक्केवारी कसा बॉक्स येतो तेथे झालेल्या नुकसानीचा अंदाज टक्केवारी द्यावी.

त्यानंतर फोटो अपलोड नावाचा बॉक्स येतो. तेथे आपल्या नुकसानग्रस्त शेताचा फोटो अपलोड करण्यासाठी आधी परवानगी द्यावी लागेल. त्यावेळी क्रॉप इन्शुरन्स टू टेक फोटो अँड रेकॉर्ड व्हिडिओ अशी ओळ येते. त्याखाली असलेल्या अनु शब्दावर क्लिक करून फोटो काढावा व खाली बरोबरचे चिन्ह असेल त्यावर क्लिक करून त्यानंतर व्हिडिओ अपलोड करावा. त्यासाठी व्हिडिओ काढण्याकरिता लाल वर्तुळावर क्लिक करावे पुन्हाबरोबर क्लिक केल्यावर व्हिडिओ अपलोड होतो.

ही सगळी प्रोसेस संपल्यानंतर ‘सादर करा’ या शब्दावर क्लिक करून त्यानंतर ऑनलाइन एप्लीकेशनवर अर्ज अपलोड होतो. त्याखाली आयडी आल्यानंतर तो आयडी लिहून ठेवावा. कारण तो अतिशय महत्त्वाचा असतो कारण या आयडीच्या माध्यमातून आपल्याला स्टेटस कळते.

English Summary: How to get the benefits of PM crop insurance through mobile Published on: 29 October 2020, 03:53 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters