पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाशी संवाद साधताना दिवाळीपर्यंत देशातील 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळणार असल्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत( पी एम जी के वाय ) मोफत धान्य पुरवठा करण्याची योजना नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली होती.
मागील वर्षी पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत देशातील 80 कोटी लोकांना आठ महिन्यांपर्यंत मोफत धान्य पुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर या योजनेचा मे-जून 2021 पर्यंत विस्तार करण्यात आला. आता पुन्हा पीएम गरीब कल्याण योजना दिवाळीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण योजना साठी अर्ज कसा करावा?
सरकारच्या या योजनेचा फायदा घेण्यासाठी सगळ्यात अगोदर मला बँक मध्ये खाते उघडावे लागते. या योजनेसाठी एक फॉर्म भरणे गरजेचे असत. हा फॉर्म च्या साह्याने सरकारला कृती की तुमच्याकडे किती मालमत्ता आहे. जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्हाला तुमच्या गावाच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन नाव रजिस्टर करावे लागते. जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर संबंधीत शहराच्या नगरपालिकेत जाऊन तिथे संपर्क साधावा लागतो या योजनेच्या साह्याने गरीब विभागातील लोक विना रेशन कार्ड मोफत धान्य घेऊ शकता.
पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत एका कुटुंबाला पाच किलो गहू किंवा तांदूळ आणि एक किलो चणे देण्याची तरतूद आहे. या योजनेअंतर्गत जे पाच किलो धान्य मिळते ते धान्य रेशन कार्ड वर उपलब्ध असलेल्या धान्याच्या कोटा व्यतिरिक्त आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत धान्य घेण्यासाठी रेशन कार्डची आवश्यकता नसते.
या योजनेअंतर्गत आधार कार्ड द्वारे गरजूंना धान्य दिले जात. परंतु सदर योजनेचा फायदा घेण्यासाठी आधार कार्ड द्वारे या योजने अंतर्गत रजिस्ट्रेशन करावे लागते. रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक स्लीप दिली जाते त्यावर मोफत धान्य घेता येईल.
Share your comments